आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

मकरसंक्रांती हा सन का साजरा केला जातो? जाणून घ्या याबद्दलची श्रद्धा आणि मान्यता…

 

देशभरात मकरसंक्रांतीचा सन हा मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो. मकर संक्रांती साजरी करण्यामागे काही विज्ञानिक करणे आहेत अत्र यामागे काही धार्मिक मान्यता पण आहेत. काही पौराणिक कथा पण या सनामागचे कारण आहे.

 

मकरसंक्रांती

 

पौराणिक कथानुसार मकरसंक्रांतीच्या दिवशीच गंगा नदि पृथ्वीवर अवतरली होती. हेच कारण आहे कि लोक या दिवशी गंगास्नान करतात. चला तर मग जाणून घेवूया मकरसक्रांती बद्दलच्या काही मान्यता आणि त्यांचे महत्व…..

 

भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार मकरसंक्रांती हा सन सूर्य द्देव आणि त्यांचे पुत्र शनी महाराज यांच्या भेटी स्वरुपात साजरा केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुची राशी मानल्या जाणाऱ्या धनु राशीतून जेंव्हा सूर्य देव हे मकर राशीकडे प्रस्थान करतात, यादिवशी असे मानले जाते कि स्वतः सूर्य देव त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी घरी जातात. यामुळे यादिवसाला मकरसंक्राती
म्हणून ओळखले जाते.

 

मकरसंक्रांती

 

या सनाबद्दलची आणखी एक मान्यता आहे, मकरसंक्रातीच्या दिवशी गंगा नदी हि भगीरथ मुनीच्या पाठोपाठ चालत कपील ऋषीच्या अश्रामावरून समुद्राला जाऊन मिळाली होती. या कारणामुळेच मकरसंक्रातीला गंगा सागर येथे खूप मोठी यात्रा भरते.

 

महाभारातातील पितामह भीष्म यांनी आपले प्राण त्यागण्यासाठी कर संक्रांतीच्या शुभ दिवसापर्यंत थांबले होते. सूर्याच्या उत्तरायणाच्या वेळी देह त्याग कराणारी आत्मा हि थेट स्वर्गात जाते अशीही मान्याता आहे. यामुळे आत्म्याला पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो. हि पण मान्यता या सणामागे आहे.

 

असे म्हटले जाते कि, मकरसंक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णू यांनी आसुरांचा अंत करून युद्ध समाप्तीची घोषणा केली होती. यामुळेच हा दिवस दुष्कर्म आणि नकारात्मकतेचा अंत मानला जातो.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here