आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

गरोदरपणात हे पदार्थ खाऊ नयेत, अन्यथा बाळाला इजा होऊ शकते.!

 

गरोदरपणात खानपानाची जरा जास्तच काळजी घ्यावी लागते. थोडेसे दुर्लक्ष झाल्यास बाळासाठी नुकसानदायक ठरू शकते. गरोदरपणात काही गोष्टी खाण्यास सख्त मनाई केली जाते, तर काही गोष्टी मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. आज आपण अशाच पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत जे, गरोदरपणात जास्त प्रमाणात खाऊ नये…

 

new google

पाऱ्याचे प्रमाण जास्त असलेले मासे.

गरोदरपणात

 

पारा हा अत्यंत विषारी असतो, हा प्रदूषित पाण्यामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. पाऱ्याचे अतिसेवन केल्याने नर्वस सिस्टम, इम्यून सिस्टम आणि किडनी यांना धोका निर्माण होतो. याची थोडीसी मात्रा होणाऱ्या बाळाच्या आरोग्यावर अत्यंत गंभीर परिणाम करू शकते. यामुळे गरोदर आणि स्थनपान करणाऱ्या मातांनी पाऱ्याचे प्रमाण जास्त असलेले मासे खाऊ नये.

 

अर्धवट शिजलेले आणि प्रोसेस्ड मांस.

गरोदरपणात

 

अर्धवट शिजलेले मांस गरोदर महिलांसाठी योग्य नाही, हे खाल्याने टोक्सोप्लाज्मा, लिस्टेरिया आणि सैल्मोनेला सारखे संक्रमण होऊ शकते आणि यामुळे होणाऱ्या बाळाच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. पैटीज आणि बर्गर यातील प्रोस्सेस केलेले मांस खाणे शक्यतो टाळावे.

 

कच्चे अंडी.

गरोदरपणात

 

कच्च्या अंड्यामध्ये सैल्मोनेला नावाचे बैक्टीरिया जंतू असतात, आणि या जंतूंमुळे ताप, उलटी, पोटदुखी, जुलाब यांसारख्या गंभीर समस्या उद्भू शकतात. काही प्रकरणांमध्ये तर गर्भाशयात गाठ होऊन बाळाचा जन्म वेळेपूर्वीच होऊ शकतो. आपण दररोज खाणाऱ्या अनेक पदार्थांमध्ये कचे अंडे असतात, त्यामुळे अशे पदार्थ आपण लेबल वाचूनच खरेदी कराय पाहिजे.

 

कॅफीन.

गरोदरपणात

अनेक महिलांना कॉफी पिणे खूप आवडते, परंतु गरोदरपणात कॅफीन खूप कमी प्रमाणात घ्यावे असा सल्ला डॉक्टरही देतात. गरोदर महिलांनी एका दिवशी 200 mg पेक्षा कमीच कॅफीन घ्यायला पाहिजे. कारण कॅफीन शरीरात लवकर मिसळते आणि यामुळे गर्भाशयात असणाऱ्या बाळाला नुकसान होऊ शकते. गरोदरपणात जास्त कॅफीन घेतल्याने बाळाचा विकास आणि वजन वाढ थांबते.

 

जंक फूड.

गरोदरपणात

गरोदरपणात बाळाच्या विकासासाठी केवळ पौष्ठीक आहाराच खायला पाहिजे, या काळात जंक फूड खाऊ नये कारण यात पोषक घटक नसतात त्याउलट साखर, चरबी जास्त प्रमाणात असते. जंक फूड खाल्ल्याने वजन खूप वाढते आणि यामुळे बाळंतपणात परेशानी होऊ शकते. गरोदरपणात आपल्या आहारात भरपूर फळे, हिरव्या भाज्या, प्रथिने, फोलेट आणि लोह यांचा समावेश करावा.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here