आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

हर्षत मेहता घोटाळा उघडकीस आणणारी पद्मश्री पुरस्कार प्राप्त निडर पत्रकार सुचेता दलाल.!

 

आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यापुर्विपासुनच पत्रकारांना खास सन्मान मिळत आला आहे. पत्रकारांनी वेळोवेळी भारतीय जनतेला चांगला मार्ग दाखवला आहे. आणि म्हणूनच पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंब म्हटले जाते.

 

new google

आज आपण अशाच निर्भीड आणि निडर माहिला पत्रकार बद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचे नाव आहे सुचेता दलाल. यांनीच हर्षत मेहता स्टोक मार्केट घोटाळा सर्वांसमोर उघडकीस आणला होता. या घोटाळयामुळेच सुचेता यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली आहे.

 

सुचेता दलाल यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी पहा आमचा हा व्हिडिओ 

 

सुचेता दलाल यांचे सुरुवाती जीवन.

संपूर्ण देशात आपली ओळख निर्माण करणाऱ्या सुचिता दलाल यांचा जन्म महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये झाला होता. त्यांनी आपले सुरुवाती शिक्षण हे मुंबईतूनच घेतले आहे. त्यानंतर त्यांनी कर्नाटक कॉलेज धारवाड येथून स्टेटैस्टिक्स (B.Sc)मध्ये आपले ग्रेजुएशन पूर्ण केले आहे.

 

याशिवाय सुचेता दलाल यांनी LLB आणि LLM ची डिग्री बॉम्बे युनिवर्सिटीतून घेतली आहे. सुचेता यांना लहानपणापासून बिजनेसची खूप आवड होती, परंतु त्यांना पत्रकार व्हायचे होते. या दोन्हीही स्वप्नांना तिने व्यापारिक पत्रकार बनून पूर्ण केले. काही दिवसांनी सुचेता दलाल यांनी देवाशिष बसू यांच्याशी लग्न केले आहे.

 

सुचेता दलाल यांचे करियर.

 

 

सुचेता दलाल यांनी पत्रकारीतेची सुरुवात १९८४ मध्ये फॉर्च्यून इंडिया सोबत केली होती. त्यानंतर १९९० मध्ये द टाइम्स ऑफ इंडिया मध्ये व्यवसाय आणि अर्थशास्त्र विभागात काम केले, त्यांच्या कामांमुळे काही कालावधीतच त्यांना द टाइम्स ऑफ इंडियाची वित्तीय संपादक म्हणून नेमण्यात आले. १९९८ पर्यत त्यांनी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये काम केले.

 

सुचेता इंडियन एक्सप्रेस समूहातही मार्गदर्शक पत्रकार राहिली आहे, त्यानंतर पती देवाशिष बासू यांनी मनिलाईफ नावाने एक पत्रिका सुरु केली ज्यामध्ये सुचेता यांनी बरेच लिखाण केले होते. आज त्या याच पत्रिकेत management editor आहेत. २०१० मध्ये सुचेता यांनी मनीलाइफ फाउंडेशन सुरु केली आहे.

 

सुचेता दलाल आणि १९९२ चा घोटाळा.

 

सुचेता दलाल

 

 

सुचेता दलाल यांनी आपल्या कामाचा भरपूर फायदा घेत देशातील अनेक घोटाळे जनतेच्या समोर उघडकीस आणले आहेत. परंतु १९९२ च्या हर्षत मीहता घोटाळ्याने सुचेता यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली होती. १९९२ मध्ये द टाइम्स ऑफ इंडिया मध्ये काम करत, स्टोक मार्केट च्या व्यापाराबद्दल चौकशी करत असताना देशातील सर्वात मोठ्या घोटाळेबाजांपैकी
एक हर्षत मेहताचा भांडाफोड केला होता.

 

हर्षत मेहता बँकमधील आपल्या ओळखीच्या आधारे हा घोटाळा करत होता. सुचेता यांनी देशातील जनतेला सामाजून सांगितले कि, कशाप्रकारे हर्षत मेहता 15 दिवसांसाठी लोन घेत होता आणि कशाप्रकारे अन्य लोकांकडून उसने पैसे घेऊन त्याने ४००० कोटी रुपयांचा घोटाळा केला होता.

 

सुचेताच्या पत्रकारीतेम्मुली आणि तपासामुळेच पोलिसांनी या प्रकरणात खास लक्ष दिले आणि याचा परिणाम म्हणून हर्षत मेहताला शिक्षा झाली होती. या प्रकरणानंतर सुचेता दलाल हे नाव सर्वांच्या परीचायाचे झाले होते.

 

सुचेता यांनी केवळ हर्षत मेहताच नव्हे तर केतन पारेख घोटाळा, सी आर भंसाली घोटाळा, आयडीबीआय घोटाळा आणि एनरॉन घोटाळा यांसारखे अनेक बहुचर्चित घोटाळे लोकांच्या सामोर उघडकीस आणले आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here