आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

1500 लोकसंख्या असलेल्या हरियाणाच्या या गावात कोणीही धुम्रपान करत नाहीत..!


या गावात कोणतीही व्यक्ती धुम्रपान करत नाही, बुजुर्ग असो किंवा जवान प्रत्येकजण बिडी, सिगरेट, पान मसाला, गुटखा यांच्यापासून दूर आहे. होय असेही एक गाव आहे, आणि हे करण्यामागचे कारणही तेवढेच खास आहे. वाचा काय आहे धुम्रपान न करण्यामागचे कारण….

 

तंबाकू

 

हरियाना राज्याच्या शेवटच्या टोकाला वसलेले आहे टिकला हे लहानशे गाव. या गावातील लोकसंख्या केवळ १५०० आहे. गाव जरी लहान असले तरी येथे अनेक दशकांपासून चालत आलेल्या महान परंपरेने या गावाला खास बनवले आहे. गावातील कोणताच व्यक्ती तंबाकूजन्य पदार्थ वापरत नाही, याव्यतिरिक्त गावात जर कोणाच्या घरी पाहुने आले तर त्यांनाही धुम्रपान न करण्याचा सल्ला दिला जातो.

या गावात एखादा अनोळखी व्यक्ती प्रवेश करत असेल तर, त्या व्यक्तीला गावातील लोकांचा पहिला प्रश्न असतो की, तुमच्या खिशात बिडी, सिगारेट, पान गुटखा तर नाहीये नां? आणि मगच पुढील गोष्ठी केल्या जातात. या लहानशा गावाला हरियाणातच नाही तर राजस्थानमध्येही आदर्श मानले जाते.

टिकला गावात तंबाकूजन्य क्कोनात्याही पदार्थाचे सेवन न करण्याची परंपरा हि आजची नाही तर अनेक दशकांपासूनची आहे. दिल्लीपासून जयपूर पर्यंत या गावाला ओळखण्याचे कारण म्हणजे म्हणजे या गावातील धुम्रपान न करणारे लोक आहेत.

 

तंबाकू

टिकला गावात बाबा भगवानदास यांची समाधी आणि मंदिर आहे. भगवानदास YANCHII २३ व्या पिढीतील गादीवर विराजमान बाबा आमार सिंह यांच्यामते, बाबा भगवानदास यांनीच तंबाकू आणि धुम्रपानावर बहिष्कार काराण्यास सुरुवात केली होती.

बाबाने केलेल्या अनेक चमत्कारांमुळे ग्रामस्थांची श्रद्धा त्यांच्यावर बसली होती, आणि तेंव्हापासून गावकऱ्यांनी कोणत्याही
प्राकारे तंबाकू न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. हि परंपरा आजही त्यांनी सांभाळली आहे.

 

तंबाकू

हरियाणा राज्याची गोष्ठ करायची झाली तर याठिकाणी हुक्का सामाजिक आणि पंचायत मध्ये मिळणे हि साधारण गोष्ट आहे. टिकला गावात जाट समुदायाची संख्या जास्त आहे. असे असूनही या गावात तंबाकूचा सख्त विरोध आहे हि नवलाची बाब आहे. गावातील युवा मुळे धुम्रपान न करण्याच्या गोष्ठी एकात आले आहेत म्हणून तेही या गोष्ठीनपासून दूरच आहेत.

टिकला गावात अनेक दशकांपासून तंबाखूजन्य पदार्थांचा वापर कोणत्याही स्वरूपात केला जात नाही. याशिवाय येथे येणार्‍या नातेवाईकांनाही कोणताही तंबाखूजन्य पदार्थ वापरण्यास परवानगी नाही. गावचे लोकच नाही तर इतर अनेक खेड्यांतील लोकांचासुद्धा इथल्या बाबांवर विश्वास आहे. या गावाच्या पावलावर पावूल ठेऊन अन्य गावही धुम्रपान मुक्त होण्याचा विचार करत आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here