आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

कुलधाराच्या १०० भुयारांमध्ये आहे करोडोंचा खजाना, जो कोणी शोधण्यासाठी गेला तो परत येऊ शकला नाही.!

 

राजस्थान मधील खाबा आणि कुलधारा हे भारतातील सर्वात भुतिया गाव आहेत आणि ते शेकडो भुयारांवर वसलेले आहेत. असे म्हटल्या जाते कि, या गावातील १०० भुयारांमध्ये पूर्वजांनी लपवलेला खूप मोठा खजाना आहे. या भुयारांमध्ये जो कोणी या खजान्याच्या शोधासाठी गेला तो आजपर्यंत वापस येऊ शकला नाही. हे भुयार उत्तरेला अफगानिस्तान आणि दक्षिणेला हैदराबाद पर्यंत जातात असे म्हटले जाते.

 

new google

कुलधारा

 

या भूयारांमागे एक कहानी आहे, आणि ती या गावच्या ब्राम्हनांशी जुडलेली आहे. हे ब्राम्हण आपले गाव सोडून गेलेले आहेत आणि त्यांचे गावे हे आता ओसाड पडलेली आहेत. या गावामध्ये असलेल्या या भूयारांनी त्यांना खूप मदत केली होती. या ब्राम्हणाच्या श्रापामुलेच हे गाव आता भुतिया बनले आहे असेही म्हणतात.

 

कुलधारा हे गाव जैसलमेर पासून केवळ १८ किमी अंतरावर स्थित आहे. असे म्हटले जाते की, पालीवाल समुदायाच्या या भागात ८४ गावे होती आणि कुलधारा हे त्यापैकी एक होते. मेहनती व उदात्त पालीवाल ब्राह्मणांच्या कुलधारा शाखेने इस १२९१ मध्ये सुमारे सहाशे घरे असलेल्या या गावाची स्थापना केली होती.

 

कुलधारा

 

हि सर्व गावे अशा वैज्ञानिक पद्धतीने बनवली होती कि प्रचंड उन्हाळ्यातही त्यांची घरे हे थंड असायची. या ब्राम्हणांना आपले वेद आणि शास्त्रांचे पूर्ण ज्ञान होते. याव्यतिरिक्त त्यांना वास्तुशास्त्राचे पूर्ण ज्ञान होते या माहितीमुळे त्यांनी स्वत: साठी बरेच काही बनवले होते. त्यावेळी हे पालीवाल लोक जैसलमेर विभागात सर्वात जास्त सारा (tax) भरत होते.

 

भारताच्या जमिनीत अशी अनेक गुप्त रहस्य दफन आहेत, जे कित्तेक पिढ्यांपासून उलगडलेले नाहीत. या रहस्यांचे धागे जितके खूप गुंतागुंतीचे आहेत. कुलाधारा बद्दल आणखी एक कहाणी सांगितली जाते, हे गाव तांत्रिक शक्तींच्या ताब्यात आहे असे म्हणतात.

 

पर्यटनस्थळात रुपांतर झालेल्या कुलधारा गावाला भरत देणाऱ्या पर्यटकांना आजही या पालीवाल ब्राह्मणांचा आवाज ऐकायला मिळतो. या गावात एक मंदिर आहे आणि केवळ हेच ठिकाण श्रापमुक्त आहे असे म्हणतात.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here