आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

कस्तुरबा गांधी यांनी पुण्यातील याच ऐतिहासिक महालात शेवटचा श्वास घेतला होता.!

 

आपल्या देशात अशी अनेक ऐतिहासिक आणि सुंदर पर्यटन स्थळे आहेत जिथे प्रत्येकजण आपल्या कुटुंबासमवेत सुट्या घालवण्यासाठी सहलीला जातो. आपल्या देशात अशी बरेच पर्यटनस्थळे आहेत जे अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार राहिलेली आहेत. या ठीकानाला भेट देण्यासाठी देश विदेशातून पर्यटक मोठ्या संखेने येतात.

 

new google

आज आपण पुण्याच्या अशाच ऐतिहासिक राजवाड्याबद्दल जाणून घेऊया, ज्याठिकाणी कस्तुरबा गांधी यांनी शेवटचा श्वास घेतला होता आणि एकेकाळी महात्मा गांधी यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

 

ऐतिहासिक

 

ऐतिहासिक आगा खान पॅलेस.

पुण्यातील येरवडा येथे असलेला आगा खान पॅलेस हा एक ऐतिहासिक वारसा आहे जो स्वतः अनेक घटनांचा साक्षीदार राहिला आहे. ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्वाचे असलेल्या या राजवाड्याचे बांधकाम सुलतान मोहम्मद शाह आगा खान द्वितीय याने इस १८९२ मध्ये केले होते.

 

६.५ हेक्टर मध्ये पसरलेल्या या विस्तृत्व महलाला आगा खान चतुर्थ याने भारत सरकारला सुपूर्द केले होते. आगा खानाने बनवलेल्या या महालात महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या अनेक आठवणी आहेत.

 

हा पॅलेस ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा आहे कारण, भारत छोडो चळवळीच्या अपयशानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि त्यांची पत्नी कस्तुरबा गांधी यांना १९४० याच आगा खान पॅलेसमध्ये नजरकैदेत ठेवले गेले होते. याशिवाय महादेव देसाई आणि सरोजिनी नायडू यांनाही नजरकैदेत ठेवले होते.

 

ऐतिहासिक

 

कस्तुरबा गांधी यांनी याच महालात शेवटचा श्वास घेतला होता, त्यांची समाधी याच महालात स्थित आहे. आज हा महाल एका संग्रहालयात बदलला आहे. या महालात गांधीजींच्या जीवनाशी संबंधित अनेक स्मारक आहेत ज्यांना बघण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी येतात. गांधीजीच्या चप्पल, चरखा याठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत.

 

आगा खानने बांधलेला हा पॅलेस आज ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या जीवनाशी संबंधित बरीच माहिती या संग्रहालयात उपस्थित आहे ती जाणून घेण्यासाठी येथे नेहमी पर्यटकांची गर्दी असते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here