आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

या राजपूत महिलेसमोर अकबर बादशहाने आपल्या जीवाची भिक मागितली होती…!


 

आपल्यापैकी अनेक लोकांना याबद्दल माहिती नसेल आणि काही लोक तर यावर विश्वासही करणार नाहीत की, अकबरसारख्या सम्राटाने कोणासमोर जीवदान मागितले असेल. हि कहाणी आहे सम्राट अकबर आणि राजपूत वीरांगना किरण देवी यांची. चला तर सविस्तर जाणून घेऊया काय प्रकरण झाले होते याबद्दल…

 

राजपूत
राजपूत किरण देवी

 

मुघल सम्राट हे त्यांच्या य्याशीसाठी ओळखले जायचे. दररोज सामान्य नागरिकांच्या बायका मुलीची अब्रू लुटणे त्यांच्यासाठी साधारण गोष्ठ होती. आपल्या अय्याशी स्वभावामुळेच बादशहा अकबर याची भेट किरण देवी यांच्याशी झाली होती. अकबर बादशहा दरवर्षी नवरोजाचे मेळावे आयोजित करायचा. याच वेळात तो आपली हवस शांत करण्यासाठी बायका मुलींचे अपहरण करत असे. अशाच एका मेळाव्यात अकबर याची भेट राजपूत किरण देवी यांच्याशी झाली होती आणि पाहताक्षणी अकबराला त्यांच्यावर प्रेम जडले होते.

राजपूत

अकबराने आपल्या सैनिकांना किरण देवी बद्दल माहिती काढण्यास सांगितले, त्याला कळले की, किरण देवी यांचे पती प्रतापसिंह हे त्याच्याच सैनेमध्ये एक सैनिक होते. अकबराने अतिशय चलाखीने प्रतापसिंह यांची बदली दुसऱ्या ठिकाणी केली आणि आपल्या दाशींना किरण देवी यांना आपल्या महालात आणण्यास सांगितले.

अकबराच्या मनामध्ये कपट होते, आपल्या सवयीप्रमाणे त्याने किरण देवी यांना सांगितले कि मला तुमच्याशी लग्न करायचे आहे. हे एकूण किरण देवी भयभीत झाल्या आणि पाठीमागे सरकल्या परंतु त्या एक राजपूत होत्या हि गोष्ठ बहुतेक अकबर विसरला होता.

 

राजपूत

सळसळते राजपुती रक्त अंगामध्ये असणाऱ्या किरण देवी ह्या मेवाडच्या शक्तीसिंह यांच्या पुत्री होत्या. ज्या कार्पेटवर अकबर उभा होता आणि किरण देवी यांच्याकडे चालत होता त्याला किरण देवीने जोरात ओढले. क्षणातच अकबर बादशहा जमिनीवर पडला आणि किरण देवी यांचा पाय त्याच्या छाताडावर, काही कळायच्या आताच त्यांनी आपला चाकू अकबराच्या गळ्यावर लावला होता. किरण देवी यांचे हे रूप बघून अकबर खूप घाबरला आणि त्याने किरण देवीकडे आपल्या जीवाची भिक मागायला सुरुवात केली.

अकबर बादशाहने राजपूत योद्ध्यांच्या ताकतीचा परिचय घेतलेले होता परंतु यावेळी त्याला कळून चुकले की, एक राजपूतानी महिलेची हिम्मत किती मोठी असू शकते. एका महिलेने अकबर सारख्या बादशाहाला भिक मागायला मजबूर केले होते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here