आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

प्राचीन इंजिनिअरिंगचा उत्तम नमुना असलेले जगातील सर्वात जुने धरण भारतात आजही सुरक्षित आहे.!


 

जगातील सर्वात प्राचीन धरण हे भारतात बनवण्यात आले होते आणि या धरणाची निर्मिती भारतीयांनीच केली होती. हि गोष्ठ अनेकांना जरा विचित्र वाटत असेल, परंतु हे सत्य आहे. सुमारे २००० वर्षापूर्वी दक्षिण भारतातील कावेरी नदीवर कल्लनई धरणाची निर्मिती करण्यात आली होती, हे धरण आज केवळ सुरक्षितच नाही तर तेथील परिसरासाठी सिंचनाचे मोठे साधन आहे.

 

new google

भारताच्या या महान इतिहासाला सर्वप्रथम इंग्रज आणि नंतर काही कपटी लोकांनी जाणीवपूर्वक भारतीय जनतेपासून लपवण्याचे काम केले आहे.

 

धरण
प्राचीन इंजिनिअरिंगचा उत्तम नमुना असलेले कल्लनई धरण.(kallanai dam)

 

 आज आम्ही भारतीयांना अभिमान वाटणाऱ्या या धरनाबद्दल सांगणार आहोत…

 

दक्षिण भारतातील कावेरी नदीवर बनलेले कल्लनई हे धरण आज तामिळनाडू राज्यातील तिरूचिरापल्ली या जिल्ह्यात आहे. या धरणाचे निर्माण कार्य हे चोल राजवटीत पूर्ण झाले होते. याठिकाणी पडणारा दुष्काळ आणि महापूर यांना लक्षात घेऊन कावेरी नदीला वळवून बनवण्यात आलेले हे धरण प्राचीन भारतीय इंजिनिअरिंगचा उत्तम नमुना आहे.

 

कल्लनई धरण चोल राजा कारीकाल यांच्या राजवटीत बनून तयार झाला होता. हे प्राचीन धरण १००० फुट लांब आणि ६० फुट रुंद आहे. या धरणाला बनवण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरण्यात आले होते ते, आजच्या आधुनिक युगातील आधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञान आहे आणि हे तंत्रज्ञान भारतीयांना सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी माहित होते. हे वाचून प्रतेक भारतीयाची छाती अभिमानाने फुलून येते.

 

धरण
प्राचीन इंजिनिअरिंगचा उत्तम नमुना असलेले कल्लनई धरण.(kallanai dam)

 

कावेरी नदीचा प्रवाह हा अतिशय तीव्र वेगाने वाहत असल्यामुळे, पावसाळ्यात या प्रदेशात पुरामुळे खूप नुकसान व्हायचे. पाण्याच्या तेवर वेगामुळे या नदीवर निर्माण कार्य किंवा धरण टिकणे सर्वात मोठे आव्हान होते. परंतु हे आव्हान त्याकाळच्या भारतीय शास्त्रज्ञांनी स्वीकारले आणि कावेरी नदीच्या तीव्र प्रवाहावर हे धरण बांधले जे आजही २००० वर्षांनंतरही जशास तसे उभे आहे.

 

हे धरण बघितल्यावर आपल्या लक्षात येईल कि याचा आकार हा नागमोडी (zic zac) आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे, नदीच्या तीव्र प्रवाहांनी धरणाच्या भिंतीवरील दबाव कमी करून वळविला जावा. हे प्राचीन भारतीय धरण केवळ आपल्या देशातीलच नाही तर जगातील सर्व आधुनिक धरणांचे प्रेरणास्त्रोत आहे. या धरणामुळे जवळपास १० लाख एकर जमिनीला सिंचन सुविधा उपलब्ध झाली आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here