आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

विश्वविजेता बनण्याचे स्वप्न उराशी घेऊन निघालेल्या सिकंदरला या देशावर मात्र आपला झेंडा फडकवता आला नाही.!


इतिहासाचा पानात अजिंक्य योद्धा म्हणून उल्लेख असलेल्या महान सिकंदरने आपल्या युद्ध कौशल्याने अनेक देशांवर वर्चस्व स्थापन केले होते. सिकंदरचा इतिहास काढला तर अधिकांश टक्के सिकंदरच्या विजयाच्याच साक्ष मिळतात.

आपण सर्वानीच सिकंदर याच्याबद्दल खूप काही वाचले असेल, परंतु तुम्हाला हे माहित आहे का? कि, विश्वविजेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिकंदर ने जगातील सर्व देशांवर आधिपत्य स्थापन केले होते परंतू एक देश जिंकण्याचे त्याचे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकले नाही. त्याचे स्वप्न भंग करणारा तो देश दुसरा कोणता नसून आपला भारत देश आहे.

सिकंदर

new google

सिकंदर जेंव्हा विश्वविजेता बनण्याचे स्वप्न घेऊन सर्वत्र आपला झेंडा फडकावत होता त्याच वेळी त्याला भारतात कशा प्रकारचे अनमोल रत्ने मिळतात आणि इथे किती धन आहे हे कळाले. भारताच्या सुंदरतेवर आणि इथल्या खजाण्यावर आकर्षित होऊन त्याने भारतावर आक्रमण केले होते. परंतु भारतावर राज करण्याचे त्याचे हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकले नाही.

 

सिकंदर

सिकंदरच्या जीवनातील सर्वांत मोठी चूक.

सिकंदर इस पूर्व ३५६ ते इस पुर्व ३२५ पर्यंत मकदूनियाचा ग्रीक प्रशासक होता. सिकंदर, एलेक्जेंडर मेसेडोनियन आणि एलेक्जेंडर तृतीय यानावानेही ओळखल्या जायचा. सिकंदरला इतिहासातील आजपर्यंतचा सर्वात कुशल सेनापती मानल्या जाते. ग्रीक लोकांना ज्या ज्या जमिनी आणि देशांची माहिती होती त्यांनी तिथे सर्वत्र आपले साम्राज्य स्थापित केले होते. यामुळेच सिकंदरला विश्वविजेता असीही म्हणतात. सिकंदरने आपल्या राज्यात इराण, इजिप्त, गाझा, सिरीया, फिनीशिया, मासोपोटेमिया, बॅक्ट्रिया आणि पंजाब ( भारताच्या थोड्या भागावर ) विजय मिळवला होता.

विश्वविजेता सिकंदर याने भारतावर आपली पकड घट्ट करण्यासाठी खूप प्रयत्न केले होते परंतु पंजाबच्या राजा पुरुवास (पोरस) यांनी सिकंदरला हरवले होते. सिकंदरने भारतावर विजय मिळवण्यासाठी सिंध प्रांतावर केलेले आक्रमण ही त्याच्या जीवनातील सर्वात मोठी चूक होती.

त्यावेळी सिंध प्रांत म्हणजे आजचे पंजाब हे राजा पोरस यांच्या अधिपत्याखाली होते. पोरस भारताच्या इतिहासातील एक महान योद्धा होते, त्यांनी त्यांच्या जीवनात एकही युध्द हारले नव्हते. राजा पोरस हे पोरसपोरवा राजवंशाचे वंशज होते, त्यांचे साम्राज्य हे पंजाबमधील झेलम आणि चिनाब नदीच्या मध्ये होते.

 

सिकंदर

 

….आणि सिकंदरचे स्वप्न तुटले.

सिकंदरने भारतावर आक्रमण केले तेंव्हा त्याला पोरसचा सामना करावा लागला होता. पोरस राजाची सेना हि सिकंदरच्या सैन्याच्या ४० पट मोठी होती. राजा पोरस आणि सिकंदर यांच्यामध्ये घमासान युध्द झाले होते. आणि या युद्धात सिकंदरने पंजाबच्या थोड्याफार ठिकाणी आपले वर्चस्व बनवले परंतु चिनाब नदीपर्यंत पोहचता पोहचता पोरसच्या सैन्याने त्याला हार स्वीकारण्यास हतबल केले आणि इथेच सिकंदरचे स्वप्न तुटले.

विश्वविजेता सिकंदरला हर स्वीकारल्यावर आपल्या मायदेशी प्पारातावे लागले, काही इत्तिहासकरांच्या मते सिकंदर भारतात अमृत मिळवण्यासाठी आला होता. तर काहींच्या मते सिकंदर इथे येण्याच्या अगोदर खूप भयभीत आणि कमजोर झाला होता. पोरसच्या सैन्यामध्ये हत्ती असल्यामुळे त्यांच्यापर्यंत सिकंदराचे सैनिक पोहचू शकत नव्हते यामुळे त्याचा पराभव झाला होता.

भारतात सिकंदरने आपल्या जीवनातील पहिली आणि शेवटची हार पत्करली होती. सिकंदरच्या मनावर या पराभवाचा असा परिनाम झाला होता कि, त्याने आपल्या मायदेशी परततानाच वाटेनेच आपला जीव सोडला.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here