आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

आयोध्येतील हनुमान गढी मंदिर मन्सूर अली या मुस्लीम सुलतानाने बांधले आहे..!


 

भारत हा सर्वधर्म समभाव मानणारा देश आहे. आज काही लोक धर्माच्या नावाखाली लढत असतील परंतु, इतिहास साक्षी आहे कि याठिकाणी जितका हिंदू आणि मुस्लीम यांचा जिव्हाळा बघायला मिळतो तितका जगातील अन्य कोणत्याही देशात बघायला नाही भेटत.

आज कित्तेक मुस्लीम फकीर बाबांची पूजा हिंदू करतात ततार काही ठिकाणी हिंदू मंदिरांना मुस्लीम व्यवस्थापक चालवत आहेत. भारतात असे केवळ दोनच हनुमान मंदिर आहेत ज्यांना मुस्लिमांनी बनवले आहे. हे मंदिर बनवण्यामागे प्रमुख कारण म्हणजे मुस्लिमांची हनुमान यांच्याप्रती असालेली श्रद्धा.

new google

 

हनुमान

 

हनुमान गढी अयोध्या.

भगवान राम यांच्या नगरीमध्ये स्थित आहे हनुमान गढी मंदिर.हे हनुमान मंदिर शरयू नदीच्या किनाऱ्यावर बनवण्यात आलेले आहे या मंदिराला जाण्यासाठी ७६ पायऱ्या चढाव्या लागतात. याठिकाणी अशी मान्यता आहे कि भगवान राम यांच्या दर्शनापूर्वी आपणास हनुमान यांची अनुमती घ्यावी लागते. अयोध्या नगरीतील हनुमान गढी हे मंदिर आज खूप प्रसिध्द आहे.

हनुमान

या मंदिराच्या निर्माणाची कहाणी तितकीच रंजक आहे, ३०० वर्षांपूर्वी या ठिकाणी सुलतान मन्सूर अली यांचे राज्य होते. एका रात्री अचानक सुलतान मन्सूर यांचा मुलगा आजारी पडला. आपला मुलगा वाचवा म्हणून सुलतानने हनुमानजी कडे धावा केला.

 

हनुमान महाराजाच्या कृपेने त्यांचा मुलगा बरा झाला, तेंव्हापासूनच त्यांची हनुमानावर श्रद्धा वाढली होती. त्यांनी खुशीने एक मंदिर बांधण्यासाठी जमीन दान केली,आणि तिथे पहिल्यांदा हनुमानाचे मंदिर बांधले .याच ठिकाणी आज हनुमान गढि मंदिर स्थित आहे.

 

हनुमान

 

संत अभयारामदास यांच्या सहयोगाने या विशाल मंदिराचे निर्माण झाले होते. संत अभयारामदास हे निर्वाणी आखाड्याचे शिष्य होते. काही काळानंतर बाहेर देशातून आलेल्या मुस्लीम शासकांनी भारतातील हिंदू मुस्लीम यांच्यात मतभेद वाढवण्याचे काम केले.

या मंदिराला तोडण्याचे अनेकवेळा प्रयत्न करण्यात आले, परंतु महाबली हनुमान यांचे मंदिर आजही थाटात उभे आहे. हे मंदिर भारतातील हिंदू मुस्लीम एकतेचे उदाहरण आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here