आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

गुडघे दुःखी, कंबर दुःखी या त्रासाने त्रस्त असाल तर करा हा जोरदार रामबाण घरगुती उपाय.

 

कभी वयामध्ये जास्त काम केल्याने किंवा अवजड सामान उचलल्यामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे आपल्याला गुडघे दुखी, कंबर दुखी असे आजार जाणवायला सुरवात होते. या आजारांचा आपल्याला जास्त त्रास सहन करावा लागतो. ऑफिसमध्ये किंवा ज्या लोकांचे काम पूर्ण वेळ खुर्चीवर बसून असते अशा लोकांना कंबरदुखीचा जास्त त्रास असतो.

 

new google

आज आपण कंबरदुखी, गुडघेदुखी ह्या आजारावरती उपाय जाणून घेणार आहोत. हे उपाय करतात ज्यांना हा त्रास आहे तो कायमचा दूर होईल. हे उपाय केल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या सांध्याचा त्रास सहन करावा लागणार नाही.

 

गुडघे

 

दिवसभर काम केल्यामुळे आपणा सर्वांना काम संपताच थकवा जाणवायला सुरूवात होते. आपल्या शरीराचे काही अवयव दुखायला सुरुवात करतात. परंतु सकाळी झोपेतून आराम करून उठल्या नंतर देखील आपल्याला थकल्यासारखे जाणवायला लागते. अंग दुखणे ,आपल्या शरीराचे काही अवयव दुखणे किंवा शिरा दुखणे अशा प्रकारचे काही ना काही सुरु असते.

 

तुम्हाला जर वारंवार ॲसिडिटीचा त्रास होत असेल, त्याचबरोबर कफ होणे, थकवा आल्यासारखे होणे किंवा चक्कर येणे अशी लक्षणे जाणवत असतील तर ही लक्षणे वातची आहेत. जेव्हा आपल्या शरीरातील वात वाढत जाते तिचे प्रमाण सामान्य प्रमाणापेक्षा जास्त होते तेव्हा आपण त्याला वात दोष किंवा वात रोग असे म्हणतो.

 

गुडघे

 

या वात रोगाचे आपल्या शरीरावरती अपायकारक परिणाम होतात. वातदोषामुळे शरीरातील हाडे ठिसूळ होतात. हाडाचे घर्षण व्हायला सुरुवात होते. याचा त्रास इतका जास्त असतो की काही दिवसांनी हाडांचा त्रास वाढत जाऊन आपले उठणे, बसणे, चालणे हे बंद होण्याची शक्यता असते. आपण जो आज उपाय पाहणार आहोत त्यामुळे वातदोषाचा आजार पूर्णपणे पळून जाईल. हाडांना पूरक कॅल्शियम भेटल्यामुळे हाडे मजबूत होतील.

 

सर्व प्रथम एका भांड्यामध्ये एक ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये तुम्हाला एक चमच्या ओवा टाकायचा आहे.ओवा टाकताना काळजी अशी घ्या की तो ओवा अर्धवट बारीक करून टाकायचा आहे. ओवा हा वात दोषावरती रामबाण उपाय म्हणून वापरला जातो. ओव्या मुळे वातीचे प्रमाणात कमी होते. त्याचबरोबर ओवा आपले अपचन किंवा पोटांचे इतर आजार दूर करण्यासाठी मदत करतो.

 

नंतर तुम्हाला त्या पाण्यामध्ये एक तमालपत्र बारीक करून टाकायचे आहे. तमालपत्र आपल्या शरीरातील ब्लॉकेज म्हणजेच रक्तवाहिन्यांचा साठी असणारे अडथळे पूर्णपणे दूर करते. तमालपत्रामुळे आपल्या शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण चांगल्याप्रकारे होते.त्याचबरोबर तमालपत्र रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.

 

गुडघे

 

त्या पाण्यामध्ये तिसरी वस्तू सुंठ टाकायची आहे. अर्धा चमचा सुंठ बारीक करून टाका. या सर्व वस्तू टाकल्यानंतर हे मिश्रण आपल्याला उकळुन घ्यायचे आहे. मिश्रण उकळण्याचा कालावधी दहा ते पंधरा मिनिटे या दरम्यान असावा.मिश्रण तोपर्यंत उकळून घ्या की एक ग्लास पाणी कमी होऊन अर्धा ग्लास इतके राहील.

 

उकळलेले मिश्रण कोमट होईपर्यंत थांबा. ते मिश्रण एका ग्लासमध्ये गाळून घ्या. ओवा सुंठ आणि तमालपत्र या सर्वांचा अर्क या पाण्यामध्ये चांगल्याप्रकारे उतरतो. कोमट झालेल्या मिश्रणाचे तुम्हाला सेवन करायचे आहे. सकाळी उठल्यानंतर ब्रश करून झाल्यावर तुम्हाला अश्या मिश्रणाचे सेवन करायचे आहे. तुम्हाला किमान एक महिना तरी नित्यनेमाने त्याचे सेवन करायचे आहे. पंधरा दिवसातच तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here