आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

मोबाईल चार्जिंग करताना या चुका करत असाल तर सावधान….

 

आपण महागडे मोबाइल खरेदी करत असतो. प्रत्येकाला आपला मोबाईल खूप जास्त दिवस चांगल्या पद्धतीने चालावा, त्याचे वर्किंग व्यवस्थित असावे त्याचबरोबर अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईलची बॅटरी आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्थित व्हावे असे वाटत असते.

 

पण तुम्ही बऱ्याच जणांकडून ऐकले असेल की मोबाईल घेतल्यानंतर थोडक्यात काही दिवसात मोबाईल चार्जिंगच्या समस्या सुरू व्हायला लागतात. काही महिन्यापूर्वी घेतलेला मोबाईल चार्जिंग च्या बाबतीत त्रास देऊ लागतो. तीन-चार तास चार्जिंग लावूनहीं मोबाईल व्यवस्थित चार्जिंग होत नाही.

 

मोबाईल

 

खूप वेळ चार्जिंग लावून जरी बॅटरी फुल चार्जिंग केली तरी पुन्हा अर्धा किंवा एक तासाने पूर्णपणे चार्जिंग संपून जाते. जर मोबाईल चार्जिंग व्यवस्थित टिकत नसेल तर मोबाईल वापरताना खूप चिडचिड होते. आपल्या अत्यंत महत्त्वाचे काम सुरू असेल आणि मोबाईल मध्ये चार्जिंग टिकत नसेल तर मोबाईल असूनही काही उपयोग होत नाही.

 

आपण मोबाईलची बॅटरी सारखी उतरत आहे अशी तक्रार कस्टमर केअर कडे जरी केली तरी ते बॅटरीला वॉरंटी नसते असे सांगतात.तसं पाहायला गेलं तर मोबाईल ची बॅटरी खूप वर्ष चांगल्या पद्धतीने टिकायला हवी. मोबाईलची बॅटरी चे वर्किंग कमीत कमी २ -३ वर्षे तरी व्यवस्थित चालायला हवे.

 

पण आपण करत असलेल्या अनेक चुकांमुळे आपल्या मोबाईलची बॅटरी खूप दिवस टिकू शकत नाही. बॅटरी चार्जिंग लावण्याच्या बाबतीत करत असलेल्या अनेक चुकांमुळे बॅटरी खराब होते . बॅटरी चार्जिंग होत नाही किंवा झालेली चार्जिंग जास्त वेळ टिकत नाही. कधीकधी आपण पाहतो की मोबाईलची बॅटरी फुगलेली असते त्याचबरोबर मोबाईलची बॅटरी फुगून तिचा स्फोट झाला अशी बातमी ही आपण बर्‍याचदा ऐकली असेल. चला तर जाणून घेऊया बॅटरी चार्जिंग करताना कोणत्या गोष्टीची आपण काळजी घ्यायला हवे.

 

मोबाईल

 

चार्जिंग लावताना मोबाइल चा कव्हर काढून ठेवावा

अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण मोबाईल चार्जिंग लावून बसतो तेव्हा मोबाईलचा पाठीमागचा कव्हर काढून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. चार्जिंग लावल्यामुळे मोबाईल गरम होतो आणि त्यावेळेला बॅटरीला पुरेशा हवेची गरज असते . आपण कव्हर काढले नाही तर बॅटरीला हवी असलेली हवा मिळत नाही. जर बॅटरी गरम झाली तर तिच्यावर निगेटिव परिणाम होतो आणि बॅटरी लवकर खराब होते.

 

 

कंपनीचा चार्जर वापरणे

तुमचा मोबाईल ज्या कंपनीचा आहे त्याच कंपनीचा ओरिजनल चार्जर लावून बॅटरी चार्जिंग करणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही दुसऱ्या कोणत्यातरी कंपनीचा चार्जर लावून चार्जिंग करत असाल तर बॅटरी लवकर खराब होण्यासाठी ही गोष्ट कारणीभूत ठरते. प्रत्येक मोबाईल नुसार आणि बॅटरी च्या क्षमतेनुसार किती अँम्पीअरचा चार्जर असावा हे प्रत्येक कंपनीने त्यानुसार बनवलेले असतात. जर तुमचा ओरिजनल चार्जर खराब झाला असेल तर तुम्ही ओरिजनल चार्जर खरेदी करा. ओरिजनल चार्जर ची किंमत थोडी जास्त असते परंतु तो मोबाईल बॅटरीच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो.

 

मोबाईल

 

बॅटरी किती टक्के चार्जिंग करावी

बऱ्याच बॅटरी किती टक्के चार्जिंग करावी याबद्दल काही कल्पना नसते. काहीजण बॅटरी शंभर टक्के चार्जिंग करतात तर काहीजण 100% चार्ज झाल्यानंतरही चार्जिंगला लावून बसतात. कारण त्यांना वाटते की बॅटरी जास्त चार्जिंग झाली तर लवकर उतरणार नाही. कंपनी मॅन्युअलमध्ये असा स्पष्ट उल्लेख केलेला असतो की बॅटरी 90 ते 95 टक्के पर्यंतच चार्जिंग करावी.

 

वरील सांगितलेले सर्व गोष्टींची तुम्ही योग्य पद्धतीने काळजी घेतली तर तुमच्या मोबाईलची चार्जिंग व्यवस्थितपणे टिकेल. त्याच बरोबर बॅटरी खराब होणार नाही . वरील सर्व गोष्टीं व्यवस्थित अमलात आणलं बॅटरी लाइफ सुद्धा वाढेल.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here