आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

एकेकाळी नुडल्स विकणारी सॅमसंग कंपनी आज इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये राज करतेय.!

 

आज सॅमसंग कंपनी हि जगातील अव्वल कंपन्यांपैकी एक आहे. जगभरात लोक या कंपनीचे स्‍मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जसे कि टीवी, फ्रीज, वाशिंग मशीन, एअर कंडिशनर यांचा वापार करतात. २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन यांनी जागातील सर्वात मोठ्या मोबाइल मैन्‍यूफैक्‍‍चरिंग प्‍लांटचे उद्घाटन केले होते. हा प्लांट नोएडा सेक्टर ८१ मध्ये जवळपास ३५ एकर परिसरात पसरलेला आहे.

 

सॅमसंग

 

सॅमसंग कंपनीचे नाव स्‍मार्टफोन बनवणाऱ्या दिग्गज कंपन्यामध्ये सामील आहे. आज भारतात सर्वाधिक लोक सॅमसंग कंपनीचेच स्‍मार्टफोन वापरतात, परंतु या कंपनीचे ग्रहाक असल्याच्या नात्याने या कंपनीचा इतिहास आपल्याला नक्कीच माहित असायला हवा. सॅमसंग कंपनी सर्वप्रथम इलेक्ट्रोनिक उपकरणे किंवा मशिनी नही तर खाद्यपदार्थ बनवत होती हे खूप कमी लोकांना माहित आहे.

 

बायुंग चूल यांनी इस १९३८ मध्ये सॅमसंग कंपनीची स्थापना केली होती. त्यावेळी हि कंपनी नुडल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य, पीठ, मासे हा माल चीनसह अन्य देशात निर्यात करत असे. यानंतर १९५० पासून १९६० पर्यंत जीवन विमा आणि टेक्‍सटाइल या क्षेत्रात व्यापार केला.

 

सॅमसंग

 

या कंपनीचे दिवस बदलण्याची सुरुवात झाली ती १९६९ मध्ये टेक्नोलॉजी सेक्टरमध्ये प्रवेश केल्यानंतर. टेक्नोलॉजी सेक्टरमध्येच या कंपनीला सॅमसंग सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स हे नाव मिळाले. त्यावेळी हि कंपनी केवळ टीवी बनवायची, १९७० मध्ये सॅमसंग कंपनीचा पहिला टीवी बाजारात आला होता. टीवी नंतर मेमेरी कार्ड आणि कंप्‍यूटरचे पार्ट बनवण्यास सुरुवात केली.

 

यानंत सॅमसंग कंपनीचे नाव सर्वत्र प्रसिद्ध झाले होते, या कंपनीने इतके यश मिळवले होते की , केवळ दक्षिण कोरियातच व्यापार करणाऱ्या या कंपनीने आता अमेरिकेसारख्या बड्या देशांमध्येही पाय ठेवला होता.

 

१९९५ मध्ये पहिल्यांदाच सॅमसंग कंपनीचा फोन बाजारात आला होता, नवीन वर्षाच्या मुहूर्तावर लोकांसाठी उपलब्ध करण्यात आले होते. दुर्भाग्यवश हा फोन ग्राहाकांच्या पसंतीस खरा उरला नाही. लोकांकाडून तक्रार येत होती कि हा फोन बरोबर काम करत नाही, हि गोष्ठ कंपनीचे मालक बायुंग चूल यांना लागताच त्यांनी न विकलेले सर्व फोन जाळून टाकले होते.

 

भारतातील सॅमसंग कंपनीचा पहिला प्लांट

सॅमसंग

 

भारतातील सॅमसंग कंपनीचा पहिला प्लांट १९९६ मध्ये सुरु करण्यात आला होता, त्यावेळी या कंपनीचे नोएडामध्येच २ उत्पादन युनिट होते. यानंतर कंपनीने १९९७ मध्ये टीव्ही बनविणे सुरू केले. २००५ मध्ये या प्लांटमध्ये मोबाइल फोन बनवण्यास सुरुवात केली. २०१२ पर्यंत सॅमसंग देशातील सर्वात नामांकित मोबाइल कंपन्यांपैकी एक बनली होती. नोएडा प्लांटमध्ये या कंपनीने गॅलेक्सी एस 3 या फोनला बनवले होते.

 

सॅमसंग कंपनीच्या इतक्या प्रदीर्घ प्रवासाबद्दल जाणून घेतल्यामुळे आपल्याला याची कल्पना येते कि, कोणीही इतक्या सहजतेने उंचीवर पोहोचत नाही, यासाठी खूप कष्ट आणि संघर्ष करावा लागतो.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here