आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

संगीत ऐकण्याच्या ह्या फायद्यांबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे.!

संगीत ऐकण्याचे फायदे….

संगीत हे मनोरंजन तर आहेच त्यासोबत ते एक साधना सुद्धा आहे. संगीताविना माणसाचे जीवनच अधुरे आहे कारण संगीत हे एखाद्या उदास माणसाच्या जीवनातही ख़ुशी देऊ शकते. आपल्या जीवनात संगीताचे किती महत्व आहे याबद्दल आपणास माहिती आहे का? संगीत हा असा मार्ग आहे ज्याद्वारे आपण जीवनात आनंद प्राप्त करुऊ शकतो. चला तर आज जाणून
घेऊया संगीत ऐकण्याचे काही खास फायद्यांबद्द्ल…..

 

संगीत

new google

 

व्यायाम करताना संगीत ऐकणे खूप फायदेमंद आहे.

बाहेर देशात करण्यात आलेल्या एका सर्वेनुसार असे आढळून आले आहे कि, संगीत उत्साह टिकून ठेवण्याचे काम करते यासोबतच धैर्य आणि स्वभावही सुधारण्यास मद्त करते. संगीत ऐकल्याने आपले लक्ष व्यायाम करतेवेळी होणाऱ्या असुविधेकडे जात नही. या सर्वेमध्ये ट्रेड मिलवर चालत असताना ३० लोकांवरील संगीताच्या परिणामाचा अभ्यास केला गेला. मोटिवेशनल आणि नॉन-मोटिवेशनल संगीत ऐकत केलेला व्यायाम हा संगीत ऐकत नसताना केलेल्या व्यायामापेक्षा चांगला होता असे आढळून आले.

 

संगीत ऐकल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.

आपल्यापैकी काही जणांना अभ्यास करताना संगीत ऐकण्याची सवय असते. अशा लोकांचे म्हणणे असते कि, संगीत ऐकताना त्यांचा अभ्यास चांगला होतो. आता तर अनेक प्रयोगांद्वारे हि गोष्ठ सिध्द झाली आहे. नियमित संगीत ऐकल्याने वाढत्या वायाचीई लक्षणे कमी दिसतात, डिमेंशियाने त्रस्त असलेल्या लोकांवरही याचा खूप परिणाम होतो. संगीतात जास्त रुची घेतल्याने शरीरात डोपामाइन हार्मोन चा स्त्राव होतो, ज्यामुळे आपल्या शरीराला स्पुर्ती मिळते.

 

संगीत

 

संगीत ऐकण्यामुळे तणाव आणि अस्वस्थता कमी होते.

शब्द नसलेले आणि हळुवार गतीचे संगीत ऐकल्याने मनाला शांती मिळते यासोबतच तणाव कमी होऊन हृदयाचे वाढलेले ठोके कमी हिण्यास मदत होते. नियमित संगीत एकने हे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फायदेशीर असते. निद्रानाशाची समस्या असेल तर दूर होते आणि रागावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. मनाच्या प्रसन्नतेसाठी शास्त्रीय संगीत किंवा बासरीची धून ऐकावी.

 

संगीत ऐकण्यामुळे वेदना कमी होतात.

रक्तदाब, हृदय गती आणि मेंदू प्रक्रिया नियंत्रित करणाऱ्या मज्जासंस्थेवर संगीताचा चांगला परिणाम होतो. स्नायूंच्या वेदनांनी पीडित लोकांचे नियमित संगीत ऐकल्यामुळे नैराश्य आणि वेदना कमी होतात. हळुवार गतीने चालणाऱ्या संगीताने हृदयगती नियंत्रित केले जाते.

 

संगीत ऐकल्याने शरीर निरोगी राहते.

संगीत ऐकण्यामुळे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयुक्त अँटीबॉडीजची पातळी सुधारते. ह्या अँटीबॉडीजब आपल्या शरीराला अनेक रोगांपासून संरक्षण करण्याचे काम करतात. याव्यतिरिक्त संगीत ऐकण्याचा पचन प्रक्रियेवर चांगला परिणाम दिसून येतो.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here