आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

आपला धाक कायम ठेवण्यासाठी तैमूरलंग या राजाने 20 लाख लोकांना बळीचा बकरा बनवलं होतं.

इतिहासाचे पाने चाळून पहिली तर आपल्याला अनेक दुखद आणि दुर्दैवी घटना वाचायला मिळतात. आपल्या देशाच्या इतिहासात तर असे काही क्रूर राजा होऊन गेले आहेत, ज्यांनी केवळ आपल्या स्वार्थासाठी निरापराध लोकांना मृत्यूची शिक्षा दिली.

 

भारतावर अनेक वर्ष मुघल आणि अन्य मुस्लीम शासकांनी राज्य केले होते. हे तर काहीच नाही काही राजांनी तर आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी माणुसकीला काळिमा फासणारे अनेक कृत्य केले आहेत.

तैमूरलंग

 

आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेऊया इतिहासातील अशाच एका क्रूर शासकाबद्दल, ज्याने जवळपास २ कोटी निष्पाप लोकांना जिवंत मारले होते. हा मुस्लीम शासक होता, चौदाव्या शतकातील तैमूरलंग, पुढे चालून यानेच तैमुर राजवंशाची स्थापना केली होती.

 

तैमूरलंगचा जन्म १३३६ मध्ये ट्रांसोजियाना याठिकाणी झाला होता. तत्कालीन ट्रांसोजियाना हे आजचे उजबेकिस्तान म्हणून ओळखले जाते. मंगोल शासक तैमूरलंग याचे राज्य पश्चिम आशिया खंडापासून ते मध्य आशिया खंडापर्यंत पसरलेले होते.

 

विस्तीर्ण साम्राज्य असूनही तैमूरलंग हा सिकंदरसारखे विश्वविजेता होण्याचे स्वप्न बाळगून होता. ज्या प्रकारे मंगोल विजेता
चंगेज खान याने मंगोलियापासून अर्ध्या युरेशिया वर आपली सत्ता कायम केली होती, त्याप्रकारे तैमूरलंग पण संपूर्ण जगाला जिंकण्याचे स्वप्न पाहत होता.

 

तैमूरलंग

 

इतिहासानुसार तैमूरलंग हा लंगडा होता परंतु यामुळे त्याच्या क्रूरतेमध्ये कोणत्याही प्रकारची कमी दिसत नसे. तैमूरलंग याने केवळ मंगोल क्षेत्रातील लोकांना बळजबरीने मुस्लीम धर्म स्वीकारण्यास भाग पडली नही तर, त्याने २ कोटी निर्दोष लोकांना यमसदनी पाठवले होते.

 

तैमूरलंगने आपाल्या साम्राज्याचा विस्तार पश्चिम आशियापासून भारतापर्यंत केला होता. त्याने आपल्या सेनापतींना आदेश दिला होता कि, जो कोणी आपल्या वाटेला अडवा येईल त्याला मारून टाका. त्याचे सैनिक पुरुषांना मारून टाकायचे तर महिला आणि मुलांना आपल्या कैदेत ठेवायचे.

 

१३८० ते १३८७ च्या मध्ये तैमूरलंग याने खुरासान, अफगानिस्तान, फारस, कुर्दिस्तान, अजरबैजान, सिस्तान या प्रदेशांवर आक्रमण करून त्यांना आपले गुलाम बनवले होते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here