आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

भगतसिंग यांना फासी दिल्याने नाराज होऊन याठिकाणी सुभाषचंद्र बोस यांनी तिरंगा फडकवला होता.!

 

आपल्या सर्वांना आजपर्यंत इतकीच माहिती आहे २६ जानेवारी भारताचे संविधान लागू झाले होते म्हणून आपण प्रजासत्ताक दिन सजरा करतो. २६ जानेवारीचाच दिवस प्रजासत्ताक दिनासाठी ठरवण्यासाठी आणखी काही करणे होती. १९३० मध्ये याच तारखेला भारतीय राष्ट्रीय कांग्रेसने भारताला पूर्ण स्वराज्य घोषित केले होते.

 

सुभाषचंद्र

 

परंतु सर्वात महत्वाचे तथ्य आजपर्यंत आपल्यापासून लपून ठेवण्यात आले आहे, ते सत्य म्हणजे २६ जानेवारीच्या दिवशीच आजाद हिंद सेनेचे नायक सुभाषचंद्र बोस यांनी कलकत्याच्या मेयर हाउसवर भारतीय तिरंगा फडकावला होता. असेही म्हणतात कि नेताजी सुभाषचंद्र बोस हे गांधीजींच्या इरविन समझौता याचा विरोध करत भगतसिंग यांना फाशी दिल्या गेल्याने नाराज होते.

 

सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय स्वतंत्रता सैनानी भगतसिंग यांना फाशीची शिक्षा होऊ नये यासाठी अथक प्रयत्न केले होते. त्यांनी गांधीजींना सांगितले होते कि इंग्रजांसोबत केलेले करार तोडून टाका आणि कोणत्याही प्रकारे भगतसिंग यांची फाशीची शिक्षा रद्द करा.

 

सुभाषचंद्र

 

सुभाषचंद्र बोस यांनी ज्यादिवशी कलकत्याच्या मेयर हाउसवर तिरंगा फडकवला होता त्यादिवशी लोक इतके अक्रोशीत आणि रागामध्ये होते कि त्यांनी कलकत्यातील हेवलाक मूर्ती तोडली होती. सुभाषचंद्र बोस यांचे हे रूप पाहून इंग्रजांनी त्यांना परत कैद करून ठेवले होते. सुभाषचंद्र बोस हे २२ ऑगस्ट १९३० मध्येच कोलकत्ता शहराचे मेयर म्हणून निवडल्या गेले होते. मेयर असूनही त्यांना जेलमध्ये जावे लागले होते.

 

१९३१ मध्ये इंग्रजांनी त्यांना जेलमधून सोडले होते, जेलमधून बाहेर आल्यावर त्यांनी सर्वात पहिले कार्य केले ते कलकत्याच्या मेयर हाउसवर तिरंगा फडकावण्याचे. आपल्या जीवनात सुभाषचंद्र बोस यांना ११ वेळा कारावास भोगावा लागला होता. शेवटच्या वेळी त्यांना १९४१ ला कलकत्याच्या कोर्टामध्ये पेशीला जायचे होते, परंतु ऐनवेळी नेताजी सुभाषचंद्र बोस हे आपल्या घरून फरार झाले आणि थेट पोहचले जर्मनीला. आणि याच वेळी सुभाषचंद्र बोस यांची मुलाखत झाली हिटलर सोबत.

 

सुभाषचंद्र

 

कोलकात्यातून त्यांना फरार होण्यासाठी त्यांना त्यांच्या मोठ्या भावाने शहरात बोस यांनी मदत केली होती. शहरात बोस ज्या करी खरेदी करायचे त्याच कारींमध्ये बसून सुभाषचंद्र बोस हे जात येत होते. शरत बोस यांना कारींची खूप आवड होती. त्यांच्याजवळ विलिज नाइट फोर्ड सोबत अन्य सात आठ करी होत्या ऑडी वांडरर डब्ल्यू-24 हि त्यापैक्कीच एक होती. याच कारीमध्ये सुभाषचंद्र बोस यांनी एल्गिन रोडवर असलेल्या आपल्या घरून इंग्रजांच्या हातावर तुरी दिल्या होत्या.

 

या घटनेला इतिहासामध्ये द ग्रेट एस्केप म्हणू ओळखली जाते. सुभाषचंद्र बोस यांचा भासा डॉक्टर शिशिर बोस यांनी नेताजींची कार चालवत त्यांना गोमो रेल्वे स्टेशन पर्यंत सोडले होते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here