आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

जन्मजात मुस्लीम नसताना देखील जिन्ना यांनी अलग पाकिस्तानची मागणी कशासाठी केली होती?


 

भारतामध्ये ज्याप्रकारे महात्मा गांधी यांना सन्मान दिला जातो त्याचप्रमाणे भारताला आपला कट्टर शत्रू समजणाऱ्या पाकिस्तानमध्ये जिन्ना यांना मान सन्मान दिला जातो. अखंड भारताला दोन तुकड्यांमध्ये विभाजनी करण्यासाठी जिन्ना हे पण जबाबदार आहेत. जिन्ना यांना आपला स्वताचा स्वतंत्र देश पाहिजे होता, ज्याठिकाणी केवळ त्यांच्या धर्माचेच लोक राहत असावे आणि त्यांच्याच धर्माचे राज्य असावे. आपली सत्ता चालवन्याकरिताच जिन्ना यांनी पाकिस्तान हे मुस्लीम राष्ट्र बनवले होते.

 

new google

जिन्ना

 

१९४७ ला जेंव्हा भारत आणि पाकिस्तान अशी वाटणी झाली तेंव्हा अनेक लोकांच्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण झाले होते. यामध्ये काही प्रश्न असेही होते ज्यांचे उत्तर विभाजनात सामील असलेले नेतेही देऊ शकले नव्हते. आता जर जिन्ना यांची गोष्ट घेतली तर भारत पाकिस्तानच्या फाळणीसाठी जिन्ना यांचा घमंडच जबाबदार होता.

 

जिन्ना यांना हे सहन होत नव्हते कि आता, स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती हे जवाहरलाल नेहरू होणार याव्यतिरिक्त जिन्ना हे गांधीजीवरही जळत होते. जिन्ना यांचा असा गैरसमज होता कि भारतात मुस्लिमांचे हक्क सुरक्षित राहणार नाहीत. परंतु आज आम्ही पाकिस्तानचे महात्मा समजल्या जाणाऱ्या जिन्ना बद्दल एक आशी गोष्ट सांगणार आहोत ज्यामुळे काही लोकांना तर आश्चर्याचा धक्काच बसेल…..

 

पाकिस्तान अलग देश बनवण्यासाठी जिन्ना हेच जबाबदार.

 

जिन्ना

 

मुस्लिमांसाठी अलग पाकिस्तान हा देश बनवा यासाठी जिन्ना यांनी देशात ठिकठिकाणी फिरून प्रचार केला होता आणि यांनीच भारताच्या फाळणीची मागणी केली होती. भारत पाकिस्तानाच्या फाळणीनंतरच जिन्ना यांना ‘ग्रेट लीडर म्हणून’ ओळखल्या जाऊ लागले होते. जिन्ना यांच्या जीवनाशी संबंधित असे काही रहस्य आहेत. जे वेळेवर लोकांच्या सामोर आले असते तर आज पाकिस्तान हा अलग देश बनलाच नसता.

 

जिन्ना एक हिंदू होते?

मोहम्मद अली जिन्ना यांच्याबद्दल असेही म्हटले जाते कि त्यांचा जन्म हा हिंदू राजपूत परिवारात झाला होता, ज्यांचे काम हे मासेमारी आणि मासेविक्रीचे होते. हिंदू असूनही मास्यांचा व्यापार करत असल्याने त्यांना ठिकठिकाणी अपमान सहन करावा लागत असे. आणि या अपमानापासून सुटकारा मिळवण्यासाठी त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारण्याचे ठरवले होते.

 

मोहम्मद आली जिन्ना, त्यांचे चार भावंड आणि आई वडिलांनी हिंदू धर्माचा त्याग करुउन मुस्लीम धर्म स्वीकारला होता. आता जीन्नाचा परिवार हा मुलीम बनून कराचीमध्ये वास्तव्यास होता. राजनीती मध्ये उतरण्यापूर्वी मोहम्मद आली जिन्ना हे स्वताला मुस्लीम म्हणून घेण्यासाठी थोडे संकोच करत. त्यांच्या परिवारातील काही सदस्य आजही गुजरातमध्ये आहेत जे कि आजही हिंदू धर्माचे अनुयायी आहेत.

 

जिन्ना

 

जिन्ना यांना अनेक गंभीर आजार होते.

मोहंमद ली जिन्ना यांना टीबी सारखा फुफ्फुसाचा गंभीर आजार झाला होता परंतु हि गिष्ठ त्यांनी सर्वांपासून लपवून ठेवली होती. जीनांच्या या आजारांबद्दल केवळ त्यांची बहिण फातिमा आणि त्यांचे डॉक्टर यांनाच माहिती होती. जिन्ना यांनी आपल्या फायद्यासाठी भारत आणि पाकिस्तानला दोन भागात विभाजित केले होते.

 

वॉयसराय यांनी आपल्या डायरीत लिहिले आहे कि, मोहम्मद अली जिन्ना हे खूप आजारी होते परंतु त्यांनी आपल्या आजारांना कधीच गंभीरतेणे घेतले नाही. ब्रिटीश भारताचे शेवटचे वॉयसराय लुईस माउंटबेटन यांनी असे सांगितले होते कि, त्यांना जिन्ना यांच्या गंभीर आजारांबद्दल कल्पना असती तर त्यांनी भारताची फाळणी कधीच होऊ दिली नसती. पाकिस्तान हे अलग मुस्लीम देश बनल्यानंतर अवघ्या १३ महिन्यानंतरच मोहम्मद आली जिन्ना हे जग सोडून गेले होते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here