आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

केवळ 55 कोटी रुपयांमुळे गांधीजींची हत्या करण्यात आली होती.!

 

३० जानेवारी १९४८ चा दिवस भारताच्या इतिहासातील काळा दिवस आहे, या दिवसाला कोणताही भारतीय विसरू शकणार नाही. या दिवशीच भारताचे महात्मा गांधीजींची हत्या करण्यात आली होती. नवी दिल्लीच्या बिरला हाउसमध्ये नथुराम गोडसे याने गांधीजींना गोळी मारून त्यांची हत्या केली होती.

 

new google

महात्मा गांधीजींची हत्तेसाठी आठ लोकांना आरोपी बनवण्यात आले होते, या पैकी पाच जणांना शिक्षा झाली तर तीन जणांना सोडून देण्यात आले. दिगंबर बडगे हा आरोपी सरकारी साक्षीदार बनला होता तर दुसरा शंकर किस्तेया याला उच्च न्यायालयाने निर्दोष केले होते आणि तिसरा आरोपी म्हणजे वीर सावरकर यांना पुरावे नसल्यामुळे सोडण्यात आले होते.

 

गांधीजीं

 

ज्या पाच आरोपींना शिक्षा झाली त्यात नाथूराम गोडसे आणि नारायण आपटे यांना फाशी झाली होती तर बाकी तीन आरोपी विष्णु करकरे, गोपाल गोडसे आणि मदनलाल यांना आजीवन कारावासाची शिक्षा देण्यात आली होती.

 

सर्व आरोपींना शिक्षा झाल्यावर गांधीजींना का मारले असावे यावर सर्वत्र चर्चा सुरु झाली होती. गांधीजींना मारण्यासाठी सर्वात पुढे नथुराम गोडसेला ठेवण्यात आले होते. आठ आरोपींपैकी नथुराम गोडसेनेच न्यायालयात कबुल केले होते कि, गांधीजींची हत्या मीच केली आहे. गांधीजींना मारल्यानंतर आणि नथुराम जेलमध्ये असताना त्यांनी गांधीजींचे पुत्र देवदास गांधी यांना या हत्तेमागचे कारण सांगितले होते.

 

गांधीजींना मारण्यामागाचे सर्वात मोठे कारण हे होते कि, नथुराम गोडसेचा आस समज होता कि, गांधीचे मुस्लीम लोकांप्रती प्रेम जरा जास्तच आहे. आणि ते सदैव केवळ मुस्लिमांच्या हक्कांसाठीच बोलत राहतात.

 

गांधीजीं

 

पाकिस्तान भारतातून अलग झाल्यावर गांधीजी यांनी असा हट्ट धरला होता कि पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्यात यावे, आणि कांग्रेस पाकिस्तानला हि रक्कम देण्याचा विचारही करत नव्हती. गांधीजींनी त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी कांग्रेसच्या विरोधात आमरण उपोषण सुरु केले होते. शेवटी त्यांच्यापुढे सरकाराला हार मानवी लागाली आणि पाकिस्तानला 55 कोटी रुपये द्यावे लागले होते.

 

पाकिस्तानला हि रक्कम दिल्याची बातमी जेंव्हा नथुराम गोडसेला कळली त्याला खूप वाईट वाटले. नथुराम हा प्रखर हिंदुत्ववादी होता त्यामुळे हा निर्णय त्यांना आवडला नाही. आणि नाराज होऊन त्याने गांधीजींची हत्या करण्याची तयारी सुरु केली.

 

३० जानेवारी रोजी त्याने महात्मा गांधींना गोळी मारली आणि त्यामुळे गांधीजींची मृत्यू झाली. या हत्तेबद्दल त्याच्या मनात काहीच खेद नव्हता, म्हणूनच त्याने दिलेली फाशीची शिक्षा खुशीने कबुल केली होती.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here