आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

युट्यूबवर अख्या महाराष्ट्रासोबत विदेशातील लोकांना सुद्धा रुचकर जेवण कस बनवायचं ते शिकवणारी “आपली आज्जी”!

70 वर्षांची आजीबाई तिच्या नातवाच्या मदतीने आज युट्युब स्टार बनली आहे.

सोशल मिडिया हे आता एक करमणुकीपुरते मर्यादित राहिले नाही. सोशल मीडियामुळे आज अनेक कुशल कंटेंट निर्मात्यांना चांगले करियर मिळवून दिले आहे. आज असे कित्तेक कंटेंट क्रीएटर आपल्या कौशल्याने भरपूर नाव आणि पैसा दोन्हीही कमावत आहेत.

 

आपल्या देशातील अनेक तरुणांनी मागील काही वर्षात सोशल मिडीयावर खूप नाव आणि कीर्ती कामवाली आहे आता या लोकांमध्ये सामील झाली आहे एक 70 वर्षांची आजीबाई, होय हि गोष्ठ एकदम खरी आहे. आपल्या जीवनात कधीच शाळेचे तोंड न पाहिलेल्या माहाराष्ट्रातील सुमन धामणे या आज युट्युब सारख्या मोठ्या व्यासपीठावर एक स्टार बनल्या आहेत.

new google

 

चवदार आणि आकर्षक पाककृती बनवण्यासंबंधित सुमन धामणे यांच्या ‘आपली आजी’ या युट्युब चॅनलने आवघ्या सहा महिन्यात सहा लाख सबस्क्रायबर बनवले आहेत. सुमन धामने आपल्या चॅनलवर पारंपारिक फ्लेवर्समध्ये घरगुती मसाल्यांनी महाराष्ट्रीयन पदार्थ कसे बनवले जातात यासंबंधित माहिती देतात.

 

सुमन धामणे यांच्या चॅनेलला लोकांचा खूप प्रदिसाद मिळत आहे. दररोज जवळपास ४००० सबस्क्रायबर वाढत आहेत आणि लाखो व्युव्स मिळत आहेत. यावर्षी त्यांना यूट्यूब क्रिएटर्स अवॉर्ड देखील मिळाला आहे.

 

आज्जी

चवदार आणि आकर्षक पदार्थ बनवणे हि या अजीबीची खासियत असली तरी तिच्या या यशाचे श्रेय तिच्या १७ वर्षाच्या नातू यशला जाते. आपल्या आजीच्या हाताचे चवदार पदार्थ खाता असताना त्याला कल्पना आली होती कि, आपण हे पदार्थ बनवतानाचे व्हिडीओ बनवून युट्युबवर टाकावेत.

 

सुमन धामणे आणि त्यांचा नातू यश हे दोघेही एका टीम सारखे काम करतात, जिथे आजी ही चवदार पदार्थ बनवते. तर नातू यश हे पदार्थ बनवतानाचे व्हिडीओ बनवतो आणि त्यांना युट्युबवरील चॅनलवर अपलोड करतो.

 

यशचे दहावीचे वर्ष असताना देखील तो आठवड्यातून दोनदा आजीचे व्हिडीओ बनवून ट्युबवरील चॅनलवर अपलोड करत असे. सुमन धामणे यांच्या सफलते विषयी विचारल्यावर त्यांनी सांगितले कि,

आज्जी

 

मला युट्यूब काय आहे हे माहित नव्हते आणि मी सोशल मिडियावर रेसिपी व्हिडिओ बनवण्याचा कधीही विचार केला नव्हता, परंतु आज मी माझ्या चॅनेलवर रेसिपीचा व्हिडीओ नाही बनवला तर मला अस्वस्थ वाटू लागते”

 

चवदार आणि आकर्षक पाककृती बनवतानाचे तिचे व्हिडिओ हे स्थानिक भाषेत मराठीत असल्याने त्त्यांना खूप फायदा झाला आहे, कारण आता बरेच स्थानिक लोक तिचे व्हिडिओ आणि रेसीपीचे चाहते बनले आहेत. आणि यामुळेच त्यांच्या चॅनेलला जास्त सबस्क्रायबर आणि फॉलोअर्स मिळण्यास मदत झाली आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा= भारतातून  नष्ट झालेली शहर..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here