आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

देशावर संकट आलेले पाहून या निजामाने इंडियन आर्मीला 5 टन सोने दान करून मदत केली होती.!


आपल्या देशात अनेक ठीकांनी निजामांचे साम्राज्य होते, निजामांच्या काळातील काही रंजक घटना टर आपण नेहमीच एकत असतो. परंतु आज आपण अशा निजामाबद्दल चर्चा करत आहोत ज्याने देशावर संकट आलेले बघून आपल्या खजाण्याचे सर्व दरवाजे देशासाठी उघडले होते.

निजाम

आपल्या देशात अशा अनेक महान लोकांनी जन्म घेतला आहे ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्या देशाला स्वतंत्र बनवले आहे.आणि काही अशा लोकांचाही जन्म या भूमीत झाला आहे ज्यांनी संकटकाळी आपल्याजवळ असणारे सारकाही देशासाठी अर्पण करून देशाची शान ठेवली आहे.

 

new google

हि गोष्ठ आहे सन १९६५ ची ज्यावेळी मीर उस्मान आली हे हैदराबाद संस्थानाचे शेवटचे निजाम होते. मीर उस्मान आली यांचे नाव त्यावेळीच्या जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये होती. निजाम मीर उस्मान आली यांच्या संपत्तीचा अंदाज यावरून लावता येतो कि, त्यांची पूर्ण संपत्ती हि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या २ टक्के होती. इतके श्रीमंत असल्यामुळे १९३७ ला टाइम्स पत्रिकेच्या मुखपृष्टावर त्यांची फोटो लावण्यात आली होती.

निजाम

भारत- पाकिस्तान यांच्यातील युध्द भारत जिंकण्याच्या वाटेवरच होता कि तेंव्हाच चीन आपले असली रूप दाखवण्यास सुरुवात करू लागला होता. तिब्बतला स्वतंत्र करण्यासाठी चीनने भारताला धमकी दिली होती. काही दिवसांपूर्वीच भारताने एक युध्द लढले होते, आता हे चीनसोबत युध्द हे जरा त्रासदायक ठरणार होते.

 

अशा परिस्थितीही भारतीय जवानांचे मनोबल खचले नव्हते परंतु सर्वात मोठा प्रश्न होता दारुगोळा. भारतीय सरकारकडे पैश्यांची खूप कमी होती, पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात भरपूर पैसा खर्च झाला होता.म्हणून पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी सैन्याला मदत करण्यासाठी भारतीय संरक्षण निधीची स्थापना केली आणि सैन्याला मदत करण्याचे लोकांना आवाहन केले होते.

निजाम

पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी भारताच्या जनतेला आणि राजा परिवारांना भारतीय सेनेसाठी मदत मागितली होती. पंतप्रधान शास्त्री यांना त्यावेळी हैदराबादचे निजाम उस्मान अली हे पण ऐकत होते. त्यांनी लाल बहादूर शास्त्री यांना हैदराबाद येथे येण्यासाठी निमंत्रण पाठवले होते. नीजम उस्मान अली यांचे निमंत्रण मिळताच शास्त्रीजी तुरंतच हैदराबादला रवाना झाले. याठिकाणी निजाम उस्मान अली यांनी त्यांचे स्वागत बेगमपेठ विमानतळावर केले होते.

 

 

शास्त्रीजींनी निजामाला संपूर्ण गोष्ट सांगितली आणि निजामाने कसलाही विचार न करता आपला खजाना भारत देशाच्या हितासाठी खुला असल्याचे सांगितले आणि राष्ट्रीय संरक्षण निधीसाठी त्यांनी 5 टन सोन्याची घोषणा केली. निजाम उस्मान यांनी हसत हसत शास्त्रीजींच्या समोर 5 टन सोन्याने भरलेल्या पेट्या ठेवल्या आणि त्यांना म्हणाले “मी हे 5 टन सोने
इंडियन आर्मीला दान करत आहे, हे दान स्वीकारा आणि निर्भयपणे युद्ध लढा आपण नक्कीच जिंकू”

 

 

निजाम

निजाम उस्मान अली यांच्या मोठ्या मनाने केलेल्या या दानाची खबर मिडियामध्ये येताच संपूर्ण द्देशात त्यांची चर्चा सुरू झाली होती. प्रत्येक भारतीयांनी निजाम उस्मान अली यांच्या या कामाचे कौतुक केले होते. भाराताबाहेरच्या मिडियाने सुद्धा हि खबर दाखवल्याने निजाम उस्मान हे जगभरात प्रसिध्द झाले होते.

 

आजपर्यंत जगात अनेक लोकांनी दान धर्म केले आहेत आणि करताना अपन आजही बघतो, परंतु उस्मान यांनी केलेले हे दान एका व्यक्तीकडून करण्यात आलेले आजपर्यंतचे सर्वात मोठे दान मानले गेले आहे. आजच्या वेळी 5 टन सोन्याची किंमत जवळपास १६०० कोटी रुपये होते.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. अधर्माची साथ दिल्यामुळे या योद्ध्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते

 

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here