आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

अक्षय कुमारसह अनेक मोठे कलाकार राम मंदिर निर्माणासाठी पुढे सरसावलेत, पहा कोणी किती दिला निधी?

आयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेकडून देशात सध्या वर्गणी गोळा केली जात आहे. या मोहीमेत आता अभिनेता अक्षय कुमारही सामील झाला आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी अक्षयने दान दिले आहेत. खुद्द त्यानेच एक व्हिडीओ शेअर करत याची माहिती दिली. सोबत लोकांनाही या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

 

अक्षयने 1 मिनिट 50 सेकंदाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. अयोध्येत आपल्या प्रभु श्रीरामाचे भव्य मंदिर उभारणीचे काम सुरु झालेय, याचा खूप आनंद आहे. आता योगदान देण्याची वेळ आपली आहे. मी सुरुवात केलीये, तुम्हीही या मोहिमेत सहभागी व्हा. जय सियाराम, असे लिहित त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

 

राम मंदिर
रामायणात सेतू बांधण्यासाठी श्रीरामांना आपल्यापरीने मदत करणारी खारूताईची कथा अक्षयने व्हिडीओत सांगितली आहे. रामसेतू बांधण्यासाठी चिमुकल्या खारूताईने, वानरांनी आपआपल्यापरीने योगदान दिले. आता राम मंदिर उभारण्यासाठी आपल्यापैकी काहींनी वानर बनूप, काहींनी खारूताई बनून आपआपल्या क्षमतेनुसार योगदान द्यावे, असे आवाहन अक्षयने केले आहे.

गुरमीत चौधरी:

राम मंदिर

गुरमीत चौधरी एक टीव्ही अभिनेता आहे. त्यांनी टीव्हीवर भगवान रामची व्यक्तिरेखा साकारली आहे. श्री राम मंदिराच्या उभारणीसाठी देणगी देण्याचेही त्यांनी सांगितले असून आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओही शेअर केला आहे. यात ते सांगत आहेत की आजपर्यंत मला अयोध्येत जाण्याचा बहुमान मिळालेला नाही, परंतु लवकरच मी माझ्या संपूर्ण कुटुंबासमवेत भगवान श्री रामला भेटण्यासाठी अयोध्येत जात आहे.

 

त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “मी आज सर्व गोष्टींसाठी मी श्रीरामचे आभार मानतो कारण माझा पहिला टीव्ही शो हा रामायण होता आणि मी भाग्यवान आहे की मला त्याचे पात्र साकारण्याची संधी मिळाली.” अयोध्यामध्ये मंदिर बांधण्यात आपण हातभार लावून आपल्याला भगवान रामाचा आशीर्वाद घेण्याची संधी आहे. मी लवकरच अयोध्येत जाण्याचा विचार करीत आहे.


हेही वाचा:

आरबीआयने जारी केली देशातील सर्वांत सुरक्षित बँकाची यादी …बघा आपली बँक या यादीमध्ये आहे का?

युट्यूबवर अख्या महाराष्ट्रासोबत विदेशातील लोकांना सुद्धा रुचकर जेवण कस बनवायचं ते शिकवणारी “आपली आज्जी”!


 

गौतम गंभीर:

राम मंदिर

भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनीही श्री राम मंदिर बांधण्यासाठी हात पुढे केला असून गंभीर यांनी एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे. गौतम गंभीर म्हणाले की, शेवटी एक जुना मुद्दा संपला. यामुळे ऐक्य व शांतीचा मार्ग प्रशस्त होईल. मी आणि माझ्या कुटुंबीयांनी थोडे योगदान दिले आहे. तुम्ही सुद्धा योगदान द्या असे आव्हान त्यांनी केले आहे.

 

आतापर्यंत देशातील अनेक बड्या व्यक्तींनी श्री राम मंदिराच्या निर्मितीसाठी आपले हात पुढे केले आहेत आणि ही प्रक्रिया सुरू आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्यासह अनेक राजकारण्यांनीही मोठ्या प्रमाणात देणगी दिली होती.

राम मंदिर

 

विशेष म्हणजे श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वतीने काही दिवसांपूर्वी देशभरातील श्री राम मंदिर बांधण्यासाठी समर्पण निधी अभियान सुरू झाले होते. त्यात लोक त्यांच्या इच्छेनुसार देणगी देऊ शकतात. देशाच्या अनेक बड्या व्यक्तींनी आतापर्यंत मंदिर बांधण्यासाठी देणगी दिली आहे. आपणास सांगू इच्छितो की, लोक घरी बसूनही ट्रस्टच्या अधिकृत वेबसाइटद्वारे देणगी देऊ शकतात.

 


हेही वाचा:

आरबीआयने जारी केली देशातील सर्वांत सुरक्षित बँकाची यादी …बघा आपली बँक या यादीमध्ये आहे का?

युट्यूबवर अख्या महाराष्ट्रासोबत विदेशातील लोकांना सुद्धा रुचकर जेवण कस बनवायचं ते शिकवणारी “आपली आज्जी”!


 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here