आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

इंग्रजांनंतर या देशाने भारतावर कब्जा करण्याचे खूप प्रयत्न केले होते!

 

भारत स्वातंत्र झाला खरा परंतु इंग्रज भारताला दोन भागात विभाजून गेले आणि पाठीमागे ठेवले भारत पाकिस्तानचे आजपर्यंत न संपलेले हाडवैर. भारत पाकिस्तान यांच्यात युद्धही झाली आहेत आणि प्रत्येक वेळी कोणत्या नाही तर कोणत्या कारणाने या दोन देशातील संबंध बिघडतातच. एक वेळ अशीही आली होती कि, भारताचे अविभाज्य भाग असलेल्या आणि भारताचे स्वर्ग समजल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीर या प्रदेशावर केवळ पाकिस्तानच नाही तर अमेरिका सुद्धा कब्जा मिळवण्याच्या तयारीत होता.

 

अमेरिका हा काश्मीरवर केवळ ताबा मिळवण्याच्या तयारीत नव्हता तर त्यांचे मुख्य उदिष्ठ होते याठिकाणी अमेरिकेचे सैन्य विमानतळ बनवणे. यासाठी अमेरिकेने खूप कट कारस्थान रचले होते. अमेरिका काश्मीरमध्ये त्यांची सेना दाखल करून एक सैन्य स्थळ बनवण्याच्या प्रयत्नात होती. परंतु त्यांची हि इच्छा कधीच पूर्ण होऊ शकली नाही.

new google

भारत

काश्मीर ताब्यात घेण्यासाठी अमेरिकेचे तत्कालीन राजदूत हेंडरसन यांनी काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री शेख अब्दुला यांच्याशी श्रीनगरमध्ये दोन गुप्त बैठका घेतल्या होत्या. असे म्हटले जाते कि त्यांच्या या बैठकीची प्लानिंग हि हेंडरसन आणि शेख अब्दुला हे दोघेही दिल्लीत भेटल्यावर झाली होती.

 

काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याच्या उद्देशाने अमेरिकेचे राजदूत हेंडरसन यांनी शेख अब्दुला यांच्यासमोर काश्मीरला भारतापासून स्वातंत्र्य करण्याचा विचार ठेवला होता. १९ सप्टेंबर १९५० रोजी याबद्दलची आधिकारिक माहिती हेंडरसन यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्याला शेख यांच्या समोर दिली होती. या घटनेच्या लागलीच शेख यांचे काश्मीर बद्दलचे विचार
बदलण्यास सुरुवात झाली होती.

 


हेही वाचा:

आरबीआयने जारी केली देशातील सर्वांत सुरक्षित बँकाची यादी …बघा आपली बँक या यादीमध्ये आहे का?

युट्यूबवर अख्या महाराष्ट्रासोबत विदेशातील लोकांना सुद्धा रुचकर जेवण कस बनवायचं ते शिकवणारी “आपली आज्जी”!


 

आता शेख अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीरच्या भारतात विलगीकरण करण्यावरही प्रश्न निर्माण केले होते. असे म्हटले जाते कि काश्मीरला भारतापासून अलग करण्यासाठी शेख अब्दुल्ला हे तयार झाले होते, परंतु त्यांनी एक अट ठेवली होती कि, अमेरिका आणि ब्रिटेन या दोन्ही देशांनी मिळून यासाठी भारत आणि पाकिस्तानवर दबाव आणावा आणि संयुक्त राष्ट्र संघाने काश्मीरला एक स्वतंत्र देशाचा दर्जा द्यावा तरच ते अमेरिकेच्या या प्रस्तावावर विचार करतील.

भारत

 

दुसऱ्या महायुद्धानंतर सुरु झालेल्या शीतयुद्धात अमेरिका आणि ब्रिटीश यांना मध्य आशियातील आपला साम्राज्यवादी स्वार्थ पूर्ण करायचा होता, परंतु त्यांच्या या मार्गावरील सर्वात मोठे अडथळे होते साम्यवादी रशिया आणि चीन. या दोन्ही देशांच्या विस्तारित धोरणामुळे अमेरिका आणि ब्रिटनला नेहमी भीती होती. काश्मीरची भौगोलिक स्थिती अशी आहे की येथून रशिया आणि चीन या दोन्ही देशांवर नियंत्रण ठेवले जाऊ शकते. परंतु अमेरिका आणि ब्रिटनच्या या कुटनीतीच्या मार्गात सर्वात मोठी बाधा अली ती काश्मीरच्या भारतात विलगीकरनाच्या रूपाने.

भारत

ब्रिटिशांनी भारत सोडल्यानंतर मध्य पूर्व आणि दक्षिण आशियामध्ये आर्थिक आणि भौगोलिक राजकीय हितसंबंधी त्यांचे मित्र राष्ट्र असलेल्या अमेरिका आणि ब्रिटेनला काळजी वाटू लागली होती. मध्य आशियाचा सीमावर्ती देश असल्याने पाकिस्तानशिवाय अमेरिकेकडे दुसरा पर्याय उरला नव्हता. हेच कारण आहे कि, अमेरिकेच्या मदतीने ब्रिटेनने साम्यवादी रशियाची घेराबंदी करण्यासाठी काश्मीरवर आक्रमण करण्याकरीता पाकिस्तानला केवळ भडकावलेच नाही तर अप्रत्यक्षपने आपला पाठिंबाही दर्शवला होता.


हेही वाचा:

आरबीआयने जारी केली देशातील सर्वांत सुरक्षित बँकाची यादी …बघा आपली बँक या यादीमध्ये आहे का?

युट्यूबवर अख्या महाराष्ट्रासोबत विदेशातील लोकांना सुद्धा रुचकर जेवण कस बनवायचं ते शिकवणारी “आपली आज्जी”!


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here