आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

दोन दशकांपासून दुष्काळ आणि माथ्यावर कर्जाचे डोंगर, अशा परिस्थितीत धामणगावच्या मदतीसाठी देव बनून आलेला IRS अधिकारी.!


महाराष्ट्रातील धामणगाव येथील अनेक युवा शेतकऱ्यांनी दुष्काळ आणि कर्ज यांचा दुहेरी मार सहन न झाल्याने आत्महत्येचा पर्याय निवडला होता. परिसरातील सर्व नदी नाले कोरडे पडले होते. हि समस्या धामणगाव मागील २० वर्षांपासून सहन करत आले होते.

 

IRS अधिकारी

भूजलाची खालावलेली पातळी आणि पावसाळ्यातील पाण्याची कमी यामुळे येथील गावकरी सदैव त्रास सहन करत आले आहेत. याच काळात धामणगाव बद्दल मुंबईच्या आयकर विभागातील जॉइंट कमिश्नर उज्वल चवन यांना माहिती मिळाली. उज्वल चवन यांना या गावची दुर्दशा बघवली नाही, ते सुद्धा याच गावाचे रहिवाशी होते. त्यांनी आपल्या मनाशी ठरवले होते आता कोणत्याही परिस्थितीत धमनगावचा कायापालट करायचा.

new google

 

बेटर इंडियाच्या रिपोर्टनुसार, उज्वल चवन यांनी सर्वप्रथम या परिसरातील पाण्याची पातळी सुधरवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी एक जलसंरक्षण मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत त्यांनी गरज पडेल त्या ठिकाणी खोदकाम आणि बंधारे बांधले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे २२ कोटी लिटर जमा करण्यात गावकऱ्यांना यश आले आणि गावाची दोन दशकांपासून चालत आलेली दुष्काळाची समस्या दूर झाली आहे.

IRS अधिकारी
IRS अधिकारी

उज्वल चवन यांनी राबवलेले हे पॅटर्न परिसरातील अन्य १६ गावांनी लागू केला, यांचा परिणाम असा झाला कि आज हे सर्व गावं तीन वर्षांपासून दुष्काळमुक्त आहेत. जॉइंट कमिश्नर उज्वल चवन हे स्वतः एका शेतकरी कुटुंबातील आहेत म्हणून त्यांना शेतकऱ्यांच्या गरजा आणि समस्या माहित आहेत. लहानपणी शेतामध्ये त्यांच्या परिवाराला सुद्धा खूप नुकसान सहन करावे लागत असे.

 

यावर प्रतिक्रिया देताना उज्वल चवन म्हणाले की, ३० वर्षापूर्वी पोकलेन मशीन नव्हती त्यामुळे ग्रामस्थांनी नुकसानीची मर्यादा लक्षात न घेता अनेक विहीरी खोदून काढल्या, विहिरींची खोली 70 फूट इतकी खोल केल्यामुळे पाण्याचे गंभीर संकट उभे राहिले आहे.

 

IRS अधिकारी

पूर्वी शेताकरी शेतात एकाच हंगामाचे उत्पन्न घ्यायचे आणि वर्षभर मग त्यांच्या हाताला काही काम लागत नव्हते, याचा परिणाम असा झाला कि, गावातील तरुण मांडली रोजगारासाठी शहराकडे वळली आणि गावाकडे राहिले केवळ बुजुर्ग आणि वृध्द व्यक्ती. यामुळे गावाचे आर्थिक चक्र मर्यादित होते आणि आमची कोणतीही बचत नव्हती. या कामासाठी गावातील लोकांनी आणि काही एनजीओच्या लोकांनी त्यांना मदत केली होती. गावातील सर्व लोकांनी प्रत्येकी 1000 रुपयांपेक्षा जास्त मदत केली होती.

 

उज्वल चवन यांच्या अथक परिश्रमाने आज परिसरातील ३०००० शेतकऱ्यांना लाभ होत आहे.

उज्वल चवन यांनी गावातील काही लोकांना याबद्दल प्रशिक्षण दिले आहे आणि आता ते लोक दुसऱ्या लोकांना शिकवतील अशी साखळी पद्धत त्यांनी बनवली आहे जी दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. त्यांच्या या प्रकल्पाचा विस्तार आजू बाजूच्या ६५ गावांमध्ये करण्याचे उज्वल चवन यांचे लक्ष आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here