आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

===

देशी खिरीला ग्लोबल टेस्ट देऊन पुण्यातील भाऊ बहिणीच्या जोडीने उभारले करोडोंचे साम्राज्य.!


 

आपल्या देशात अगदी प्राचीन काळापासून खाद्यपदार्थ बनवण्यासाठी नवनवीन प्रयोग केले जातात. आपण जेवणात कितीही आवडीने खाल्ले तरी त्याचा शेवट हा एखाद्या गोड पदार्थानेच केला जातो. आपल्या देशात खीर हही सार्वत्र आवडीने क्खली जाती, भारताच्या प्रत्येक भागात अलग अलग नावाने मिळणारी खीर हि अनेक लोकांच्या तोंडाला पाणी आणते.

 

 

 

आता हि खीर विकून जर कोणी करोडोंची माया जमवली असे आपल्याला कळाले तर आपण त्यावर विश्वास ठेवणार नाही, परंतु पुण्याच्या शिवांग आणि शिविका सूद या भावा-बहिणीच्या जोडीने ही गोष्ट साक्षात खरी करून दाखवली आहे.

 

आपल्या आईच्या रेसिपीनुसार खीर बनवून आणि विकून हे दोघेही करोडपती बनले आहेत. La Kheer Deli किंवा LKD या नावाने प्रसिध्द असलेल्या त्यांच्या आऊटलेटमध्ये विकल्या जाणारी गुलकंद, चॉकलेट, न्यूटेला, ओरिओ आणि ब्राऊनी या फ्लेवरची खीर आता देशात सर्वत्र प्रसिध्द झाली आहे.

शिवांग आणि शिविका सूद यांनी एकत्र मिळून Sooduku Foods LLP, LKD या नावाने आपला ब्रांड बाजारात आणला होता. यामागचा त्यांचा उद्देश होता घरगुती खिरीला ग्लोबल टेस्ट देऊन सर्वांसमोर सदर करणे हा होता. २०२९ मध्ये सुरु केलेला त्यांचा हा व्यवसाय आज करोडोंमध्ये पोहचला आहे. त्यांचा हा व्यवासाय आता केवळ पुण्यापुरता मर्यादित नसून भारतातील अनेक्क मोठ मोठ्यां शहारात पोहचला आहे.

खिरी

 

 

बेटर इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी माहिती दिली कि, दोघे भावंड लहान असताना त्यांची आई त्यांच्यासाठी खीर बनवायची जी संपूर्ण परिवाराला खूप आवडायची. एका दिवशी रोजच्या चवीचा कंटाळा आल्याने शिविकाने आईने बनवलेल्या खिरीमध्ये थोडेसे न्यूटेला आणि ओरिओ टाकले आणि आता या खिरीचा स्वाद पूर्णतः बदलला होता.

न्यूटेला आणि ओरिओ टाकलेली खीर त्यांनी आईला खाण्यासाठी सांगितले तिचा स्वाद बघून आईपण चकित झाली होती. मग काय त्यांनी यावर आणखी प्रयोग करण्यास सुरुवात केलीई आणि मग सर्वांसमोर आणले गुलकंद, चॉकलेट, न्यूटेला, ओरिओ आणि ब्राऊनी हे सर्व फ्लेवर.

सुरुवातीला हि कल्पना डोक्यात आल्यावर त्यांनी पुण्यातील स्टारबक्सच्या बाहेर एक लहानसा गाडा लाऊन खीर विकण्यास सुरुवात केली आणि त्यांचा प्रवास इथपर्यंत पोहचला आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here