आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

(गुजरात मधील ६२ वर्षीय महिला दुध विकून करोडपती बनली आहे, आपले नशीब आपल्या हाताने लिहणारी हि महिला आहे तरी कोन? / सर्वांसाठी नुकसानदायक ठरलेले २०२० वर्ष या महिलेसाठी वरदान ठरले आहे.!)

आपण अनेकदा म्हणतो कि, माणूस हा वयाने जरी मोठा असला तरी मनाने तरुण असावा मग कोणताही प्रवास कठीण वाटत नाही. आपल्या अवती-भवती असे अनेक लोक असतात ज्यांनी आपल्या कमी वयातच बर्याच गोष्टी प्राप्त केलेल्या असतात आणि असेच लोकं हे प्रत्येकासाठी प्रेरणास्थान बनतात.

महिला
महिला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असलेल्या गुजरातमध्ये नेहमीच एखादा विषय तरी चर्चेत असतो, गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील नगाणा गावच्या रहिवाशी असलेल्या नवलबेन दलसंगभाई चौधरी या ६२ वर्षीय महिलेने अशीच एक यशोगाथा सर्वांसमोर मांडली आहे आणि त्यांच्याबद्दल आज जो कोणी ऐकतो त्याला धक्का बसल्या शिवाय राहत नाही. गेल्या वर्षी नवलबेन दलसंगभाई चौधरी यांनी आपल्या दुध डेअरी सुरु केली होती आणि त्यांचा हा व्यवसाय एका वर्षातच एव्हढा वाढला आहे कि, त्याला आपण एक परिवर्तन म्हणून बघू शकतो.

 

एका अहवालानुसार नवलबेन चौधरी यांनी २०२० मध्ये १ कोटी १० लाख रुपयांचे दुध विकून एक नवा विक्रम बनवला आहे. नवलबेन यांनी मागील वर्षी दरमहिन्याला ३.५० लाख रुपयांचा नफा कमावला आहे. नवलबेन यांच्याजवळ आज ८० म्हशी आणि ४० गायी आहेत, ज्या अनेक गावांमधील लोकांच्या दुधाच्या गरजा भागवतात. नवलबेन चौधरी यांच्या डेअरीच्या व्यवसायामुळे आज त्यांच्या १५ कर्मचाऱ्यांचा सुद्धा उदरनिर्वाह चालत आहे.

new google

अमूल डेअरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एस. सोधी यांनी गेल्या वर्षी आपल्या ट्विटर हँडलवर “10 Millionaire Rural Women Entrepreneurs”  १० लखपती ग्रामीण महिला उद्योजकांची एक यादी प्रकाशित केली होती. या यादीमध्ये नवलबेन चौधरी यांनी २०२९-२० या आर्थिक वर्षात 221595.6kg दुध विकून 87,95,900.67 रुपयांचा व्यवसाय केल्याचे नमूद केले होते.

 

या ग्रामीण महिला उद्योजकांनी अमूल उद्योग समूहाला दुध आणि इतर दुग्धपदार्थांचा पुरवठा करून लाखो रुपये कमावले होते, त्यांच्या या कामगिरीबद्दल अमूल ब्रँडच्या वरिष्ठ कार्यकारिणी मंडळाकडून त्यांचा सत्कारही करण्यात आला होता. बनासकांठा जिल्ह्यातील डेअरी क्षेत्रात केलेल्या अलौकिक कामगिरीबद्दल नवलबेन यांना दोन लक्ष्मी पुरस्कार आणि तीन सर्वोत्कृष्ट पशुपालक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.

महिला

 

नवलबेन चौधरी यांना त्यांच्या व्यवसायाबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या होत्या, “माझ्या शहरात राहणाऱ्या मुलांपेक्षा मी जास्त कमावते, माझे चार मुले हे शहरात शिकतात आणि काम करतात. मी स्वतः ८० म्हशी आणि ४० गायी सांभाळत आपले डेअरीचे कामकाजही बघते.”

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here