आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

केवळ एका शाळेत जाणाऱ्या मुलीसाठी जपानच्या सरकाने एक रेल्वे चालू ठेवली होती.!


 

आपल्या देशात आजही काही ठिकाणी शाळेत जाण्यासाठी मुलांना नदी पार करूण जावे लागते तर काही ठिकाणी कीत्तेक किमी अंतर पैदल चलावे लागते. आपल्या देशात यासाठी शिक्षा नीती आणि प्रशासनाला दोष दिला जातो. याबद्दल जापानच्या सरकार कडून खूप काही शिकण्यासारखे आहे.

 

new google

जपानच्या होक्काइडो या रेल्वे स्टेशनला स्थानिक प्रशासनाने केवळ एका शाळकरी मुलीसाठी सुरु ठेवले होते. एक शाळकरी मुलगी वेळेवर शाळेत पोहोचावी म्हणून त्यांनी उचललेल्या या पावलावर सर्वांनी कौतुक केले होते.

 

हि घटना आहे २०१५ मध्ये घडलेली, सोशल मिडीयावर हि जुनी बातमी खूप व्हायरल होत आहे. जगातील सर्व देशांनी या घटनेतून बोध घ्यायला पाहिजे, कारण प्रत्येक राष्ट्राच्या निर्माणासाठी शिक्षनाचे खूप मोठी योगदान असते.

 

सीसीटीवी न्यूज या वाहिनीच्या रिपोर्टनुसार, अनेक वर्षांपासून जापानच्या होक्काइडो येथील शिरातकी या स्टेशनवरून केवळ एक शाळकरी मुलगीच प्रवास करत होती, ती आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी दररोज येथून जात येत असे. हि रेल्वे शाळेच्या वेळेनुसारच दोन वेळ चालत असे.

मुली

 

हि घटना ऐकण्यासाठी थोडी फिल्मी वाटते, परंतु जपान रेल्वेने या स्टेशनला केवळ यासाठीच सुरु ठेवले जेणेकरून हि मुलगी दररोज शाळेत जावी आणि तिचे शिक्षण अर्धवट राहू नये. शिरातकी रेल्वे स्टेशन हे जपानच्या सुदूर परिसरात आहे. याठिकाणी लोकांची ये जा हि नाही च्या बराबरच आहे. या लाईन वरून मालगाडी सुद्धा धावत नाही. सरकारसाठी हे स्टेशन नुकसानीमध्ये राहु लागले होते.

 

जपान रेल्वेने निर्णय घेतला होता कि, २०१५ पासून या स्टेशनवरून कोणतीही रेल्वे धावणार नाही. परंतु मिळालेल्या माहितीनुसार या मुलीच्या आई वडिलांनी रेल्वे विभागाला विनंती केली होती कि, त्यानंतर रेल्वेने मुलीचे शिक्षण पूर्ण होई पर्यंत म्हणजेच मार्च २०१६ पर्यंत रेल्वे सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला होता. जपानच्या रेल्वे विभागामार्फत उचललेल्या या पावलामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

दगडांत कोरून तयार केलेल्या या गुफांमध्ये आहेत अनेक देवांचे मंदिरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here