आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

बाटक मियां नसते तर गांधीजींना विष देऊन मारण्याचा इंग्रजांचा डाव सफल झाला असता.!


बिहारमधील कुक बाटक मियांबद्दल खुप कमी लोकांना माहिती आहे. यांनी केवळ गांधीजींचे प्राणच वाचवले नाही तर त्यासाठी खूप मोठी किंमत मोजली होती. ३० जानेवारी १९४८ रोजी सायंकाळी दिल्लीच्या बिर्ला हाउस येथे नथुराम गोडसेने गांधीजींना तीन गोळ्या घालून मारले होते. या घटनेच्या काही वेळानंतरच पंतप्रधान जवाहरलाल नेहरूं यांनी अतिशय दुखामध्ये “भारतीयांच्या जीवनाला प्रकाशमय करणारा सूर्य मावळला” असे उद्गार काढले होते.

 

१५ नोव्हेंबर १९४९ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येप्रकरणी फासी दिलेलेया नथुराम गोडसे आणि त्याच्या इतर साथीदारांबद्दल अनेक जणांनी खूप काही लिहिले आहे. परंतु महात्मा गांधी यांचा जीव वाचवण्यासाठी खूप मोठी किंमत मोजणाऱ्या बिहारच्या स्वयंपाक्याबद्दल कोणीच काही लिहिले नाही हे आपल्या देशाचे खूप मोठे दुर्दैव आहे असे म्हणावे लागेल. चला आज आपण जाणून घेऊया त्या महान व्यक्तीबद्दल ज्याला इतिहास विसरून गेला आहे.

new google

 

1 एप्रिल १९१७ रोजी हजारो लोक बिहारच्या चंपारन मधील मोतीहारी रेल्वे स्थानकात एका व्यक्तीची वाट बघत थांबले होते. दुपारच्या वेळी मुजफ्फरपूर येथून येणाऱ्या ट्रेनमधून गांधीजी खाली उतरले आणि लोकांच्या थव्याने त्यांना चारी बाजूने घेरले होते. स्थानिक जमीनदारांकडून शेतकऱ्यांना खूप त्रास दिल्या जात होता याचा आढावा घेण्यासाठी ते याठिकाणी आले होते. कोणालाही याची कल्पना नव्हती कि, काही दिवसांनी हेच गांधीजी सत्याग्रहाच्या नावाखाली भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका निभावणार आहेत.

 

बाटक मियां
बाटक मियां

 

“चंपारण के स्वतंत्रत्रता सेनानी” या पुस्तकानुसार गांधीजी येथे पोहचल्यावर त्यांना इंडिगो प्लांटेशन चे ब्रिटीश मॅनेजर एर्विन यांच्याकडून रात्रीच्या जेवणाचे आमंत्रण मिळाले होते. गांधीजी इंग्रजांसाठी नुकसानदायक ठरू शकतात हि बाब ध्यानात आल्यामुळे त्यांनी या रात्री गांधीजींना मारण्याचे ठरवले होते.

त्यांचा कट ठरल्यावर एर्विन यांनी त्याच्या घरी स्वयंपाक बनवणाऱ्या बाटक मियां यांना सांगितले कि गांधीजींना विष टाकलेल्या दुधाचा ग्लास द्यावा. यासाठी त्यांनी बाटक मियां यांना खूप मोठे बक्षीस देण्याचे आमिष दाखवले होते तसेच त्यांचे काम करण्यास नकार दिल्यास कठोर शिक्षा देण्याची धमकी सुद्धा दिली होती. देशभक्त बाटक मियां यांनी ठरलेल्या वेळी गांधीजींना विषारी दुधाचा प्याला दिला होता परंतु त्यासंबधी त्यांना सावध केले होते. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद हे या संपूर्ण घटनेचे साक्षी होते.

या घटनेतून गांधीजी सुखरूप वाचले होते आणि त्यांनी चंपारण सत्याग्रह सुद्धा केला होता, परंतु इंग्राजांचा स्वयंपाकी बाटक मियां ज्या व्यक्तीने त्यांचा जीव वाचवला त्याला फार मोबदला द्यावा लागला होता. बाटक मियां यांना कामावरून काढून टाकण्यात आले आणि तुरुंगात टाकून त्यांच्यावर खूप अत्याचार केले गेले. त्यांच्या गराच्या सर्व सदस्यांना गावाबाहेर हाकलून दिले आणि त्यांच्या घराला स्मशान बनवले होते.

राजेंद्र प्रसाद यांनी भरसभेत बाटक मियां यांची ओळख करून दिली होती, त्यांनी सर्वांना सांगितले कि हि व्यक्ती नसती तर बांधिजी आपल्या समोर राहिले नसते. इंग्रजांची नोकरी सोडून देशासाठी त्यांनि केलेल्या त्यागाबद्दल राष्ट्रपतींनी बाटक मियांच्या परिवाराला सरकारकडून २४ एकर जमीन देण्याचे आश्वासन केले होते परंतू ते आजपर्यंत पूर्ण झाले नाही.

२०१० मध्ये हिंदुस्तान टाईम्सच्या एका बातमीमुळे त्तात्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी राजेंद्र प्रस्साद यांचे आश्वासन पूर्ण करण्य्याचा निर्धार करून यासाठी स्थानिक प्रशासनाला आदेश दिला होता, परंतु त्यावरही कोणतीच कारवाई होऊ शकली नाही. गांधीजी साठी आपले सर्व काही कुर्बान करणाऱ्या या देशभक्त बाटक मियां यांचे परिवारातील लोक आज जमिनीच्या लहानशा तुकड्यावर जगत आहेत हेच आपल्या देशाचे सर्वात मोठे दुर्दैव.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here