आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

गर्लफ्रेंड ने धोका दिला आणि या व्यक्तीचे नशीबच खुलले, चक्क ३० कोटी रुपयांची लॉटरी जिंकली.!


आपल्या सोबत कोणता योगायोग घडून येईल याचा काही नेम नाही. हि गोष्ठ खरी करणारी घटना घडली आहे दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग या शहरामध्ये. याठिकाणी राहणारा पिटर (बदललेले नाव ) नावाचा व्यक्ती खूप निराश झालेला होता, याचे कारण होते त्याची गर्लफ्रेंड त्याला सोडून गेली होती. आपली गर्लफ्रेंड सोडून गेल्याने तो अतिशय दुखी होता आणि अचानक असे काही घडले त्याचे दुख हे आनंदामध्ये बदलले.

 

पिटरची गर्लफ्रेंड त्याला सोडून जाऊन आता काही तासच झाले होते आणि त्याला ३ मिलियन पौंडची (जवळपास ३० कोटी रुपये) लॉटरी लागली. यानंतर पिटर इतका खुश झाला होता कि त्याने आपल्या गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी एक फ्रीज खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता.

new google

 

आईविटनेस न्‍यूज रिपोर्टनुसार पिटर इतके खुश झाले होते कि त्यांना स्वतःला शांत करण्यासाठी गार पाण्याने स्नान करावे लागले होते. फायनान्स क्षेत्रात काम करणाऱ्या पिटर यांनी 19 जानेवारीला राष्ट्रीय लॉटरी ऑपरेटरच्या कार्यालयात जाऊन त्यांचे बक्षीस प्राप्त केले होते. १५ जानेवारीला पिटरने लॉटरी जिंकली होती आणि योगायोगाने त्याच दिवशी त्याची गर्लफ्रेंड त्याला सोडून गेली होती.

 

याविषयी बोलताना पिटरने सांगितले कि, “मला आताही विश्वास होत नाही कि मी इतके पैसे जिंकले आहेत, आजपर्यंत लॉटरीच्या साहाय्याने मी केवळ २३०० रुपये कमवू शकलो होतो. माझ्यासोबत लिव इन मध्ये राहणारी माझी गर्लफ्रेंड मला सोडून गेली होती यामुळे माझा मूड अतिशय खराब झाला होता. शुक्रवारी रात्री मी लॉटरी चा रिजल्‍ट बघितला, त्यावेळी मी एकटाच होतो. मी लॉटरी जिंकली आहे हे मला एखाद्या स्वप्नासारखे वाटत होते”

गर्लफ्रेंड

लॉटरी चा रिजल्‍ट बघितल्यावर पिटरला गार पाण्याने अंघोळ करावी लागली होती, आणि अंघोळ करून परत आल्यावर त्यांनी बघितले कि हे सर्व खरच आहे कि त्याचा भास आहे. पिटरने ठरवले आहे कि, यातील मोठी रक्कम ते अशा ठिकाणी गुंतवतील ज्यातून त्यांना नेहमी फायदा होईल. बाकीच्या पैशांमध्ये पिटर आपल्या सोडून गेलेल्या  गर्लफ्रेंड साठी फ्रीज आणि वाशिंग मशीन घेणार आहेत. त्यांच्या गर्लफ्रेंड बद्दल त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारची नाराजी नाही असेही त्यांनी सांगितले आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here