आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

मॅगीचा भारतातील सर्वांच्या आवडीचे नुडल्स बनण्यापर्यंतचा प्रवास.!


 

मॅगी हि मघ्यमवर्गीय भारतीयांसाठी चांगला पर्याय आहे. जेवण बनवण्यासाठी वेळ नसल्यास प्रत्येकाला सर्वात आधी विचार येतो २ मिनिटात बनून तयार होणाऱ्या मॅगी नूडल्सचा. मॅगीची कमी किंमत आणि चवदार स्वाद यामुळे ती प्रत्येक भारतीय घरातील मुख्य अन्न बनले आहे. आज जाणून घेऊया या ब्रँडला भारतात एवढी प्रसिद्धी कशी मिळाली याबद्दल…

 

new google

मॅगीचा शोध हा स्वीझरलँडच्या ज्युलियस मॅगी यांनी सन १८७२ मध्ये लावला होता. त्यावेळी औद्योगिक क्षेत्रात झपाट्याने विकास होत होता आणि महिलांना कारखान्यात बाराच वेळ काम केल्यामुळे स्वयंपाक बनवण्यासाठी वेळ मिळत नव्हता. ज्युलियस मॅगी यांनी या समस्येवर पर्याय म्हन्नून सर्वासमोर मॅगी नुडल्सचा अविष्कार केला, हे नुडल्स किवळ उकडून 5 मिनिटात तयार होत आणि याशिवाय उर्जा आणि पोषक तत्वांचे चांगलेच स्त्रोत होते.

 

सन १८५७ पर्यंत मॅगी नुडल्स हे जर्मनीच्या बाजारपेठेतही पोहचले होते. मॅगी या नावाखाली आता प्रोटिन्सयुक्त सूप आणि इतर पदार्थही बाजारात आले होते, अमेरिका आणि फ्रांसमध्ये सुद्धा मॅगीची लोकप्रियता झपाट्याने वाढत होती. सन १९१२ मध्ये मॅगीचे जनक ज्युलियस मॅगी यांचे निधन झाले.

 

१९४७ मध्ये नेसले या कंपनीच्या मदतीने मॅगी नुडल्स भारतात दाखल झाले, आणि भारतात येताच मॅगी नुडल्स सर्वांना आपले वेड लावून सोडले होते.

नेसले या कंपनीने मॅगी नुडल्ससाठी संपूर्ण भारतात त्याकाळी १०० कोटी रुपये गुंतवले होते. सुरुवातीच्या काळात कोणीही मॅगीला गांभीर्याने घेतले नाही. नेसलेने सुद्धा कधी विचार केला नसेल कि एक दिवस हे मॅगी नुडल्स प्रत्येक भारतीयांच्या घरात उपलब्द असतील.

आज ज्या व्यक्तीला स्वयंपाकातील काहीच बनवता येत नाही ती व्यक्ती सुद्धा किचनमध्ये जाऊन मॅगी नुडल्स बनवते.

मॅगी

 

मॅगीची १९ व्या शतकात  जाहिरात हि काळ्या पांढऱ्या पडद्यावर करण्यात आली होती. ज्यामध्ये असे दाखवण्यात आले होते कि, काही भुकेली लहान मुळे हि त्यांच्या आईला खाण्यासाठी काहीतरी करण्यास सांगतात आणि त्यांची आई त्यांना 5 मिनिटात मॅगी नुडल्स उकडून खायला देते.

या जाहिरातीमुळे मॅगी हा ब्रँड शहरी भागातील सर्वोत्तम स्नॅक्स बनला होता. जीवनशैली बदलण्यामुळे कामगार वर्गातील व्यक्तींची गरज बनली होती. मॅगी बद्दलची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती केवळ 2 मिनिटांत बनविली जाऊ शकते.

 

सध्या मॅगी या ब्रँडकडे नुसल्स व्यतिरीक्त अनेक उत्पादने आहेत ज्यामध्ये मॅगी कप्पा मॅनिया इन्स्टंट नूडल्स, सूप, इन्स्टंट मिक्स फूड आयटम आणि सॉस सामील आहेत.

गेल्या 2 दशकात मॅगीमुळे नेस्लेच्या नफ्यामध्ये २५ टक्यांनी वाढ झाली आहे. त्यांची वार्षिक उलाढाल हि 1000 कोटी झाली आहे. तुमच्या आवडीचे नुडल्स कोणते आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा.


 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here