आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

पतीचे निधन आणि डोक्यावर कर्जाचा भार असताना देखील, सविता लभडे यांनी संघर्षातून स्वप्नपूर्ती केली आहे.!

 

२००८ मध्ये सविता लभडे यांच्यासमोर खूप मोठे आणि अनपेक्षित संकट आले होते, त्यांच्या पतीचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. पती  यांनी त्यांच्या पश्चात मागे ठेवले होते त्यांचे २ अपत्य आणि बँकांचे ७ लाख रुपयांचे कर्ज.

new google

 

 

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात राहणाऱ्या सविता लभडे यांना त्यांच्या पतीने घेतलेल्या कर्जाबद्दल काहीच कल्पना नव्हती, त्यांना याबद्दलची माहिती तेंव्हा मिळाली जेंव्हा बँकाचे कर्मचारी कर्जवापसी साठी नोटीसा घेऊन त्यांच्या दारात येऊन उभे राहिले. पतीचे निधन होऊन एक वर्ष उलटल्यावर त्यांना याबद्दल माहिती मिळाली आणि आतापर्यंत कर्जाची रक्कम हि व्याज वाढून जास्त झाली होती.

 

 

 

अचानक आभाळ फाटावे त्यासारखे भले मोठे संकट पाहून त्यांना कोणी धीर देणाराही नव्हता, या आर्थिक संकटातून स्वताला सावाराण्यासाठी सविता लभडे यांना आपल्याकडील एकमेव मौल्यवान वस्तू त्यांची सोन्याची साखळी विकावी लागली होती. सविता लभडे यांचे मुले तेव्हा लहान होती. मुलगा चौथ्या वर्गात तर मुलगी सातव्या वर्गात होती. परिवाराला सावरण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागली होती.

 

 

सविता लभडे यांच्याकडे अडीच एकर द्राक्षांची बाग होती परंतु त्यातून त्यांना वर्षातून एकदाच उत्पन्न मिळायचे आणि त्यांना द्राक्षांची शेती कशा प्रकारे करतात याबाद्दल काहीही माहिती नव्हती. यामुळे त्यांनी द्राक्षांची शेती न करता भाजीपाला पिकण्यावर जोर दिला.

 

सविता लभडे
सविता लभडे-आणि त्यांचा परिवार

 

 

परंतु यातून मिळणाऱ्या पैशांमधून तिच्या पतीचे कर्ज फेडणे हे शक्य दिसत नव्हते, भाजीपाला विकून महिन्याकाठी त्यांना केवळ १०००० रुपये फायदा होत होता, या रकमेतून पतीचे कर्ज चुकवणे हे ती विचारही करू शकत नव्हती कारण या १०००० रुपयातील काही रक्कम तर तिच्या परिवाराचे पालन पोषण करण्यातच जात होती.

 

 

सविता लभडे यांना मसाला बनवण्याच्या मशीन बद्दल माहिती मिळाली होती या मशीनची किंमत हि ६०००० रुपये होती. त्यांच्या एका मित्राने त्यांना सांगितले कि तुम्ही मसाला बनवणारी मशीन खरेदी करून जोड धंदा सुरु करा. या गोष्ठीवर सविता लभडे यांनी खूप विचार केला आणि ठरवले कि हि मशीन आणायची. त्यांच्याकडे पतीने दिलेल्या काही सोन्याचे दागिने होते ते विकून आणि जवळचे काही पैसे गुंतवून त्यांनी हि मशीन खरेदी केली होती. या व्यवसायात त्यांना महिन्याला ५०००० रुपये कमाई होत होती.

 

 

भाजीपाला उत्पन्नातून जास्त नफा मिळत नसल्याने तिने गहू आणि सोयाबीन यांची शेती करण्यास सुरु केली होती. पतीचे निधन झाल्यानंतर लगातार सहा वर्ष काबाडकष्ठ केल्यामुळे २०१४ पर्यंत त्यांच्या कर्जाची परतफेड होऊ शकली होती. २०१५ पर्यंत सविताला प्रती महिना ६०००० रुपये उत्पन्न मिळू लागले होते.

 

 

मसाल्यांचा व्यापार हा काही ठराविक काळासाठीच असतो यावर पर्याय म्हणून तिने शेतातही नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली होती, आता सोयाबीन आणि गहू यानंतर तिने उसाची शेती करण्यास सुरुवात केली होती.

 

 

१०१९ मध्ये सविताने साधना नावाने एक जनरल स्टोअर उघडले होते, मसाल्यांचा व्यवसाय मंदावला असता या दुकानातून त्याच्या कमतरतेची भरपाई होते. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आता कुठे त्यांना आपल्या परिवाराचे संगोपन करण्यासाठी पुरेसे उत्पन्न मिळणारे मार्ग सापडले आहेत.

 

 

सविता यांचा मुलगा धीरजने आता इलेक्ट्रॉनिक्समध्ये करिअर बनवले आहे आणि मुलगी साधना राज्य पोलिस सेवेत दाखल होण्याची तयारी करत आहेत. सविता लभडे सांगतात कि ज्या दिवशी मी कर्जाची परतफेड केली तो दिवस माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा दिवस होता. प्रत्येक महिलेने त्यांच्याकडून आदर्श घ्यावा असा त्यांचा प्रवास आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here