आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

एका महिलेच्या तक्रारीमुळे मिंत्रा या ई-कॉमर्स कंपनीला आपला ब्रांड लोगो बदलावा लागत आहे.!

 

ऑनलाईन शॉपिंग साठी प्रसिध्द असलेल्या मिंत्रा या ई-कॉमर्स कंपनीने आपला लोगो बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या एका महिलेने सायबर पोलीसांकडे याबद्दल तक्रार दाखल केली होती. त्यांचे म्हणणे आहे कि ला लोगो महिलांच्या अस्मितेला ठेस पोहचवणारा आहे, ज्यामुळे महिलांचा अपमान होत आहे.

 

 

मुंबईच्या या समाजसेवक महिलेचे नाव आहे नाज पटेल त्या सध्या अवेस्टा फाउंडेशन एनजीओशी (Avesta Foundation NGO) जुडलेल्या आहेत. नाज पटेल यांनी डिसेंबर २०२० मध्ये मिंत्रा या ई-कॉमर्स कंपनीवर आरोप करत तक्रार दाखल केली होती. त्यांनी या कंपनीला केवळ लोगो बदलण्याची मागणी केली नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाही करण्याची मागणी सायबर पोलिसांकडे केली आहे.

 

मिंत्रा

 

मुंबई पोलीस कमिशनर सायबर क्राईम विभागाचे डीसीपी रश्मि करनदिकर यांनी याबद्दल अधिक माहिती देताना सांगितले कि, आम्हाला असे आढळून आले आहे कि मिंत्रा या ई-कॉमर्स कंपनीचा लोगो हा महिलासाठी अपमानजनक आहे. तक्रारीनंतर आम्ही मिंत्रा या ई-कॉमर्स कंपनीला मेल करून याबद्दल पूर्वसूचना दिली आहे. त्यांचे अधिकारी आम्हाला भेटून गेले आहेत आणि त्यांनी हा लोगो एका महिन्याच्या आत बदलला जाईल अशी ग्वाही दिली आहे.

 

 

विवादात अडकल्या नंतर मिंत्रा ई-कॉमर्स कंपनीने आपल्या वेबसाइट, अॅप आणि पैकेजिंग मटीरियल्सवर असलेला त्यांचा लोगो बदलण्याचे आदेश दिले आहेत. त्यांचे पैकेजिंग मटीरियल्स हे आता नवीन लोगो साहित बनवल्या जात आहे.

 

 

मिंत्रा ही कपडे आणि एसेसरीज खरेदीसाठी भारतातील दिग्गज ऑनलाइन रिटेलर कंपनी आहे. २०२० मध्ये मिंत्राच्या वेबसाइट भेट देणाऱ्या लोकांच्या संखेमध्ये ५१ टक्यांनी वाढ झालेली आहे.

 

मिंत्राच्या या जुन्या लोगोमध्ये महिलांचे प्रतिकात्मक गुप्तांग दर्शविले होते असा आरोप करण्यात आला होता. तुमचे याबद्दल काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here