आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

शेवटी २०२१ मध्ये जेठालालने बबिताजीला प्रपोज केलेच.


 

जगातील सर्वात जास्त दिवस चालत असलेला कॉमेडी टीवी शो “तारक मेहता का उल्टा चश्मा” यामध्ये रोजच चढ उतार बघायला मिळतात. अनेक वर्षांपासून चालत असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अलगच छाप सोडली आहे. या मालिकेमधील मुख्य पात्र असलेल्या जेठालाल यांची कहाणी आणि त्यांच्या जीवनात घडत असलेल्या मनोरंजक घटनांमुळे प्रत्येकजण हसल्या शिवाय राहत नाही.

 

new google

 

“तारक मेहता का उल्टा चश्मा” या मालिकेच्या ट्वीटर अकाऊंट वरून करण्यात आलेल्या एका व्हिडीओ मध्ये हा सगळा प्रकार बघायला मिळत आहे.

 

जेठालाल

 

 

आता या मालिकेच्या येणाऱ्या काही भागात जेठालाल यांच्या जीवनात नवीन अडचण येणार आहे, कारण आता या व्हायरल व्हिडीओमध्ये जेठालाल हे बबिता जी यांना आय लव यु म्हणताना दिसत आहेत. तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत जेठालाल हे बबितावर खूप प्रेम करतात परंतु त्यांना सांगू शकत नाहीत. आता ते बबिताला प्रपोज करणार म्हटल्यावर त्यांच्या जीवनात हंगामा तर होणारच. सर्वत्त महत्वाची गोष्ट म्हणजे जेठालाल यांची धर्मपत्नी दयाबेन घरी नसताना त्त्यांचे हे आय लव यु बाबूजी चंपकलाल ऐकतात.

 

 

तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा च्या येणाऱ्या भागात जेठालाल आणि बबिता हे दोघेही जेठालालच्या घरी एकटेच दिसणार आहेत आणि त्याच वेळी जेठालाल बबिताला आय लव यु म्हणून प्रपोज करताना दिसणार आहेत. परंतु जेठालाल यांना भानच राहिले नाही कि, त्यांचे बापुजी हे यावेळी घरातच होते आणि त्त्यांनी हा सगळा प्रकार बघितला आणि ऐकला सुद्धा.

 

 

बबिता आणि जेठालाल एक दुसऱ्याच्या समोर बसलेले असताना जेठालाल एकदा नाही तर तीन वेळा त्यांना आय लव यु म्हणतो, आणि यावर बबिता काहीच आक्षेप घेत नाही उलट ती त्यांना वाह वाह म्हणताना दिसत आहे. हे सर्व बापुजी बघतात आणि मग काय त्यांचा राग ते जेठालालवर काढतात हि घटना बघून तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल हे मात्र निश्चित आहे.

 

 

बापुजी आलेले बघून जेठालाल आणि बबिता असे दर्शवण्याचा प्रयत्न करतात कि, काहीच घडले नाही, म्हणून बाबूजी यांना जास्तच राग येतो. आता जेठालालने हे सर्व कशासाठी केले आणि बाबूजी त्याला काय सजा देतील हे सर्व आपण “तारक मेहता का उल्टा चश्मा” या मालिकेच्या येणाऱ्या भागात बघू शकतील.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here