आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

पाकिस्तान आता मोहम्मद अली जिन्ना यांची निशाणी समजली जाणारे फातिमा जिन्‍ना पार्क आता गहान ठेवणार आहे.!

 

आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला आता अनेक अडचनींचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तान सरकारची परिस्थिती इतकी बिकट झाली आहे कि, त्यांचे पंतप्रधान इमरान खान आता त्यांच्या देशाचे संस्थापक नेता मोहम्मद अली जिन्ना यांची निशाणी समजले जाणारे पार्क आता गहाण ठेवणार आहेत. फातिमा जिन्ना नावाचे हे पार्क मोहम्मद अली
जिन्ना आणि त्यांची बहिण फातिमा जिन्ना यांना समर्पित करण्यात आले होते. आता पाकिस्तान सरकार या पार्कला गहाण ठेऊन ५०० अरब रुपयांचे कर्ज घेणार आहे.

 

 

पाकिस्तान सरकारने सरकारी मालमत्ता गहाण ठेवण्याची हि पहिली घटना नाहीये, यापूर्वी पण त्यांनी अनेक मालमत्ता गहाण ठेवल्या आहेत. आता तर त्यांनी अतीच केली आहे देशाच्या अस्मितेचा जरही विचार न करता त्यांनी जिन्ना यांच्याशी संबंधित मालमत्ता गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात इस्लामाबादच्या कैपिटल डेवलपमेंट अथॉरिटीने काही दिवसांपूर्वीच ना हरकत प्रमाणपत्र (NOC) घेतले आहे.

 

पाकिस्तान

 

 

आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या पाकिस्तान मध्ये याबद्द्दल सर्वप्रथम स्थानिक न्यूजपेपर डॉन मध्ये छापण्यात आले होते. आता पाकिस्तानची जनता त्यांच्या सरकारवर प्रश्न विचारत आहे. जिन्ना यांच्याशी थेट संबंध असलेल्या ज्या पार्कमुळे सध्या पाकिस्तान मध्ये गोन्धाल सुरु आहे ते इस्लामाबादमधील सर्वात मोठे पार्क आहे. फातिमा जिन्ना नावाचे हे पार्क ७५० एकरमध्ये पसरलेले एखाद्या अरण्यासारखे आहे.

 

 

आतिशय विशाल असल्यामुळे या पार्कची तुलना बर्‍याचदा न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्कशी केली जाते. १९९२ मध्ये सुरु झालेल्या या पार्काची विशेषता येथील हिरवळ आहे. फातिमा पार्कमध्ये केवळ काही ठिकाणीच पुतळे आणि दुसरे काही बांधकाम आहे त्याव्यतिरिक्त सर्व पार्कमध्ये झाडे झुडुपे आणि हिरवळ आहे. अमेरिकेच्या सेंट्रल पार्कमध्ये सुद्धा अशाच प्रकारची हिरवळ बघायला मिळते आणि लाखो लोक याठिकाणी भेट देण्यासाठी येतात.

 

 

इस्लामाबादमध्ये स्थित असलेल्या या पार्कला कॅपिटल पार्क किंवा माथेर-ए-मिलत पार्क असेही म्हणतात. या पार्कच्या एका भागात स्पोर्ट्स कॉम्प्लैक्स बनवण्यात आले आहे. याठिकाणी खेळण्यासाठी आणि वॉटर एक्टिविटीसाठी स्वीमींग पूल बनवण्यात आले आहेत. याठिकाणी अनेक रेस्टॉरंट आणि कॉफी शॉप उघडण्यात आले आहेत. २०११ मध्ये या पार्कचे वातावरण खराब होण्याच्या भीतीने पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारची सर्व दुकानं बंद केली होती.

 

 

आता हे पार्क गहाण ठेवण्यासाठी पाकिस्तान सरकारने प्रयत्त्न सुरु केले आहेत. पाकिस्तान सर्व बाजूनी कर्जबाजारी झाला आहे. त्याचा घानिष्ठ मित्र मानल्या जाणाऱ्या सौदीसारख्या देशानेही आता त्यांच्यापासून सर्व संबंध तोडले आहेत आणि नवीन कर्ज देण्यासाठी नकार दिला आहे. अशी परिस्थिती असताना देखील पाकिस्तानने मागील वर्षी ७.५ अरब डॉलरचे कर्ज घेतले आहे.

 

 

या परिस्थितीत पाकिस्तानकडे जास्त पर्याय उरले नाहीत म्हणूनच पाकिस्तानी सरकार लगातार आपल्या ऐतिहासिक इमारती व इतर जंगम मालमत्ता गहाण ठेवत आहे. फातिमा जिन्ना पार्क गहाण ठेवण्याच्या मुद्द्यावरून आता पाकिस्तानच्या जनतेमध्ये खूप आक्रोश आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here