आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

हॉंगकॉंग ला सपोर्ट करून ब्रिटेन आता चीनसोबत दुष्मनी का करत आहे?

 

मागील काही दिवसांपासून उघडपणे आपले विस्तारवादी धोरणे दाखविणार्‍या चीनने आता ब्रिटेनसोबत दुष्मनी वाढवत आहे. हॉंगकॉंगला खुलेआम सपोर्ट करत असल्यामुळे चीन ब्रिटीश सरकारवर नाराज आहे. हाँगकाँगमध्ये सुरक्षा कायदा लागू झाल्यापासून ब्रिटनने तेथील ५४ लाख लोकांना आपल्या देशात राहण्याची आणि काम करण्याची परवानगी दिली आहे. हाँगकाँगच्या लोकांबद्दल ब्रिटेनने दाखवलेल्या सहानुभूतीमुळे चीन सध्या ब्रिटेनवर खूप नाराज आहे.

 

अफूच्या व्यापारातून ब्रिटिश सरकारला मोठ्या प्रमाणात टक्केवारी मिळाल्यामुळे ब्रिटीश राजवटीला सुरुवात झाली. त्याने समुद्रामार्गे चीनमध्ये सैन्य पाठविले. चिनी सैन्य त्यांच्याशी लढायला तयार नव्हते. तसेच सैनिकांनाही अफूचे व्यसन होते. मद्यधुंद झाल्याने ते लढू शकले नाहीत. या अफू युद्धामध्ये हजारो चिनी सैनिक मारले गेले, तर ब्रिटीश सैन्याला फारसा त्रास झाला नाही.

 

हॉंगकॉंग

 

पासपोर्ट स्वीकारण्यास चीनचा नकार.

३१ जानेवारी २०२१ पासून ब्रिटेन हाँगकाँगच्या रहिवाश्यांसाठी ही नवीन नागरिकत्व योजना सुरू करणार आहे. यावर चीनने आता ब्रिटीश नॅशनल ओव्हरसीज (बीएनओ) पासपोर्ट स्वीकारण्यास नकार दिला आहे. चीनचे असे म्हणणे आहे कि, ब्रिटेन हाँगकाँगच्या नागरिकांना चीनविरूद्ध भडकावण्याचे काम करीत आहे. त्याचबरोबर नागरिकत्व देण्याला चीन आपल्या अंतर्गत बाबतीत ब्रीटेनचा हस्तक्षेप मानत आहे.

 

नेमके हे प्रकरण आहे तरी काय?

हॉंगकॉंग २०१९ मध्ये चीन विरोधी आंदोलन सुरु झाले होते, हे आंदोलन राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या विरोधात केले जात होते. हा कायदा लोकशाहीविरोधात असल्याने याच्या निषेधार्थ जगभरातील देश हाँगकाँगच्या बाजूने आले होते. कुटनीती करून हॉंगकॉंगवर लादल्या जाणाऱ्याया कायद्याच्या विरोधात अमेरिका पासून ते भारतापर्यंत सर्व देशांनी चीनला घेरले होते. परंतु याच वेळी ब्रिटेनने केवळ विरोधच दर्शवला नाही तर, आंदोलन करणाऱ्या लोकांना आपल्या देशात येऊन काम करण्याचे निमंत्रणही देऊन टाकले होते.

 

हॉंगकॉंगला सपोर्ट करण्यामागे ब्रिटेनचा कोणता स्वार्थ दडला आहे?

हॉंगकॉंगला सपोर्ट करण्यामागे ब्रिटेनचा कोणता स्वार्थ दडला आहे का? याबद्दल जास्त माहिती घेण्यासाठी आपल्याला भूतकाळात जावे लागेल ज्यावेळी हाँगकाँग हे ब्रिटीश सरकारचा एक भाग होते. हि कहाणी सुरु होते ब्रिटेन आणि चीन
यांच्यामध्ये अफिम साठी होणाऱ्या लढाईपासून. त्यावेळी ब्रिटीश व्यापारी हे चहाच्या बदल्यात अफिमचा पुरवठा करत होते. चीनमध्ये अफिमचा उपयोग औषधे बनवण्यासाठी आणि खाण्यासाठी केला जायचा.

 

अफिम हि याठिकाणी बेकायदेशीर असूनही भारतातील अफिमचा पुरवठा हे ब्रिटीश व्यापारी लपून छपून चहाच्या बदल्यात करत होते. काही दिवसांनी येथील लोकांना अफिमची नशा करण्याची सवय झाली होती. १९३९ मध्ये चीनच्या लोकांची दुर्दशा बघून चीनी राजा डाओग्वांग याने नशेखोरी विरोधात एक मोहीम राबवली होती. अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आणि नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे अफिम हे जप्त करण्यात आले होते.

 

ब्रिटेनचा चीनवर हल्ला.

ब्रिटीश सरकारला अफिमच्या व्यापारातून मोठ्या प्रमाणात फायदा होत होता, आणि त्याचा व्यापार चीनमध्ये होणार नाही असे कळल्यावर ब्रिटीश सरकार चीनवर भडकले होते. रागाच्या भारत त्यांनी आपले सैन्य सागरी मार्गाने चीनवर हल्ला करण्यासाठी पाठवले. चीनचे सैनिक हे लढायला तयार वाव्हाते आणि याव्यतिरिक्त त्यांना अफिमचे व्यसनही होते त्यामुळे या युद्धात हजारोंच्या संखेत चीनी सैनिक मारल्या गेले होते. दुसरीकडे ब्रिटिशांच्या सेनेला जास्त काही नुकसान पोहचले नव्हते.

 

युद्धानंतर १८४२ मध्ये ब्रिटेन आणि चीन यांच्यादरम्यान एक करार झाला होता, या कराराअंतर्गत चीनला आपले बंदरे ब्रिटीश व्यापाऱ्यांसाठी खोलावी लागली आणि अफिमच्या व्यवसायात झालेल्या नुकसानीची भरपाई हि चीनला द्यावी लागणार होती. हा करार एकाच बाजूने विचार करून केल्यामुळे त्याला “अनइक्वल ट्रीटी” म्हणून ओळखल्या जाते. याच कराराअंतर्गत ब्रिटेनने हाँगकाँगवर ताबा मिळवला होता.

 

१९८४ मध्ये झालेल्या नव्या कराराअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला होता की, ब्रिटेन आपली सत्ता असलेली वसाहत हाँगकाँग चीनला परत करेल. ब्रिटेनचे तत्कालीन पंतप्रधान मारग्रेट थैचर आणि चीनच्या जाओ जियांग यांनी या संयुक्त करारावर
सह्या केल्या होत्या. या करारानुसार १३ वर्षानंतर हाँगकाँग चीनला परत मिळणार होते. अखेर १९९७ मध्ये १५५ वर्षानंतर ब्रिटेनकडून हाँगकाँग चीनला परत मिळाले होते.

 

या कराराअंतर्गत काही अटींसह चीनने बर्‍याच गोष्टींवर सहमती दर्शविली होती, जसे की हाँगकाँगला विशेष प्रशासकीय क्षेत्र म्हणून घोषित केले गेले, चीनमध्ये कम्युनिस्ट व्यवस्था आहे, तर हाँगकाँगमध्ये भांडवलशाही व्यवस्था आहे. हाँगकाँगला मिळवण्यासाठी चीनने ब्रीटेनला खात्री करुन दिली की, तेथील नागरिकांचना जे अधिकार आहेत ते अधिकार चीनमध्ये सामील झाल्यानंतरही अबाधित राहतील.

 

परंतु या कराराचे उलंघन करत चीनने वेळोवेळी हाँगकाँगच्या अंतर्गत कामकाजात हस्तक्षेप केला आहे. चीनने याठिकाणी राष्ट्रीय सुरक्षा कायदा देखील लागू केला ज्यामुळे हाँगकाँगच्या लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. हाँगकाँगच्या
जनतेची हि दुर्दशा बघूनच आता ब्रिटेनने त्यांना आपल्या देशात येऊन राहण्याचे आणि काम करण्याचे आमंत्रण दिले आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here