आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

कपिल शर्मापासून राम कपूर पर्यंत टीवी शोमध्ये काम करून करोडोंची संपत्ती जमवणारे टॉप १० टीवी स्टार…

 

बॉलीवूड प्रमाणेच टीवी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा अनेक स्टार कलाकार आहेत. यातिक काही कलाकारांनी आपल्या मेहनतीने स्वताची अलग ओळख निर्माण केली आहे आणि ते आज टीवी इंडस्ट्री मधील सर्वात महागडे कलाकार बनले आहेत.

 

new google

टीवी च्या महागड्या कलाकारांमध्ये कपिल शर्मा, हिना खान, राम कपूर पासून साक्षी तंवर आणि सुनील ग्रोवर यांचा समावेश आहे. टीवी च्या एका एपिसोड साठी हे लाखो रुपये मानधन घेतात. आज आपण जाणून घेऊया अशाच टॉप १० टीवी कलाकारांबद्दल आणि ते किती मानधन घेतात याबद्दल …

 

कपिल शर्मा

संपूर्ण जगाला हसवणारा आणि भारताचा कॉमेडी किंग समजल्या जाणारा कपिल शर्मा टीवी इंडस्ट्री मधील सर्वात महागड्या कलाकारांपैकी एक आहे. कपिल शर्मा एका एपिसोडसाठी तब्बल ६० लाख ते ८० लाख रुपये एवढे मानधन घेतो.

 

टीवी

 

सुनील ग्रोवर

सुनील ग्रोवर हा एक कॉमेडियन, एक्टर आणि खर म्हटलं तर एका अर्थाने तो ऑलराउंडर आहे. कपिल शर्माच्या शोमधील गुत्थी आणि डॉक्टर मशहूर गुलाटी हे पात्र लोकांच्या मनात उतरले होते. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या तांडव वेबसिरीजमध्ये पण त्याला बघितल्या गेल होत. सुनील ग्रोहर आपल्या एका एपिसोडसाठी १० लाख ते १२ लाख रुपये मानधन घेतो.

 

हिना खान

टीवी इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिध्द कलाकारांपैकी एक हीना खान सुद्धा सर्वात महागड्या कलाकारांमध्ये सामील आहे. काही रिपोर्टनुसार हीना खान एका एपिसोडसाठी जवळपास २ लाख रुपये मानधन घेते.

 

राम कपूर

राम कपूर हे सर्वात जुन्या आणि टैलेंटड कलाकारांपैकी एक आहेत. राम कपूरने आपल्या टीवी करीयरची सुरुवार सुपरहिट शो “बड़े अच्छे लगते हैं”द्वारे केली होती. या शोच्या माध्यमातून राम कपूरने आपली अलग छाप सोडली आहे. राम कपूर आपल्या एका एपिसोडसाठी १.५ लाख रुपये मानधन घेतात.

 

दिव्यांका त्रिपाठी

दिव्यांका त्रिपाठी सुद्धा खूप लोकप्रिय आणि महागडी कलाकार आहे. ३६ वर्षीय दिव्यांकाने आपल्या अभिनयाची सुरुवात ये है मोहब्बतें या शोद्वारे केली होती तिने बनूं मैं तेरी दुल्हन या सुपरहिट शोमध्ये पण अभिनय केला आहे. दिव्यांका त्रिपाठी आपल्या एका एपिसोडसाठी १.५ लाख रुपये मानधन घेते.

 

मिशाल रहेजा

मिशाल रहेजा याने लागी तुझसे लगन, कुमकुम भाग्य आणि इश्क का रंग सफेद या मालिकांमध्ये साकारलेल्या पात्रांमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मिशाल आपल्या एका एपिसोडसाठी १.५ लाख रुपये मानधन घेतो.

 

रोनित रॉय

रोनित रॉयला कोणात्याही ओळखीची गरज नाही. या कलाकाराला प्रेक्षक टीवी चा अमिताभ बच्चन मानतात. रोनित रॉय यांनी अनेक अवार्ड जिंकले आहेत याशिवाय त्यांनी अनेक वेबसिरीज,आणि चित्रपटातही काम केले आहे. टीवीवर त्यांचा शो अदालत हा खूप लोकप्रिय झाला होता. रोनित रॉय आपल्या एका एपिसोडसाठी १.५ लाख रुपये मानधन घेतो.

 

राम कपूर

साक्षी तंवर हि टीवी च्या सर्वात जुन्या आणि प्रसिध्द कलाकारांपैकी एक आहे. आपल्या कहानी घर-घर आणि बड़े अच्छे लगते हैं या शो च्या माध्यमातून प्रत्येक घरात आपली ओळख बनवली होती. साक्षी आपल्या एका एपिसोडसाठी १.२५ लाख रुपये मानधन घेते.

 

करण पटेल

कहानी घर-घर की, ये है मोहब्बतें आणि कसौटी जिंदगी की या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात आपली अलग ओळख निर्माण करणाऱ्या करणने काही चित्रपटातहि काम केले आहे. कारण आपल्या एका एपिसोडसाठी १ लाख रुपये मानधन घेतो.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here