आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

आता तुम्हीही प्राप्त करु शकता डिजिटल वोटर आईडी कार्ड, डाउनलोड करण्यासाठी वाचा हा महत्वाचा लेख.!

 

भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त (e-EPIC) ई-ईपीआयसी ( इलेक्ट्रॉनिक मतदार फोटो ओळखपत्र ) सुरू केले आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ई-ईपीआयसी कार्यक्रमाचे उद्घाटन केले आहे, या कार्यक्रमात त्यांनी पाच नवीन मतदारांना डिजिटल वोटर आईडी कार्ड वितरीत केले आहे.

 

आजपर्यंत भारत सरकारने अशा प्रकारचे ओळखपत्र बनवले नव्हते, डिजिटल स्वरुपात मतदार ओळखपत्र देण्याची ही पहिली वेळ आहे. भारतीयांना जास्त गरज पडणारे अन्य ओळखपत्र जसे कि आधार कार्ड, पैन कार्ड, ड्राइविंग लाइसेंस हे अगोदरपासूनच डिजिटल स्वरुपात उपलब्ध आहेत.

 

डिजिटल

 

भारतीय निवडणूक आयोगाने २५ जानेवारीला ११ वा मतदार दिन साजरा केला आहे, कार्यक्रमातील यावर्षीचा मुख्य विषय हा “मेकिंग अवर वोटर्स एम्पावर्ड, विजिलेंट, सेफ एंड इंफॉर्मेड” होता. नवी दिल्लीत भारतीय निवडणूक आयोगातर्फे आयोजित या राष्ट्रीय कार्यक्रमात राष्ट्रपती राम नाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राष्ट्रीय मतदार दिन हा २०११ पासून दरवर्षी २५ जानेवारीला साजरा केला जातो.

 

भारतीय निवडणूक आयोगातर्फे देण्यात आलेल्या काही महत्वाच्या सूचना….

 

१ ) ई-ईपीआयसी (e-EPIC) हे एक (non-editable)संपादन न करण्यायोग्य सुरक्षित पीडीएफ आवृत्ती असेल.

 

२ ) २५जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान पहिल्या टप्प्यात निवडणूक आयोगाकडे मतदार नोंदणीसाठी अर्ज केलेले आणि मोबाईल क्रमांक नोंदविणारे नवीन मतदारच आपले डिजिटल मतदार ओळखपत्र (e-EPIC)डाउनलोड करू शकतील.

 

३ ) तुमचा मोबाईल नंबर जर निवडणूक आयोगाशी लिंक असेल तर पुढच्या महिन्यापासून ( १ फेब्रुवारी ) पासून सर्व मतदार त्यांच्या डिजिटल मतदार ओळखपत्र (e-EPIC) डाउनलोड करु शकतील.

 

४ ) ज्या मतदारांचा मोबाईल नंबर लिंक केलेला नाही त्यांना डाउनलोड सुविधेचा लाभ घेण्यासाठी मोबाईल नंबर लिंक करावा लागेल.

 

५ ) डिजिटल मतदार ओळखपत्र (e-EPIC)हे पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असतील.

 

६ ) नवीन मतदारांना त्यांच्या मतदार ओळखपत्राची हार्ड कॉपीही मिळेल.

 

७ ) मतदार ओळखपत्र (e-EPIC) डिजिटल बनवण्यामागचे मुख्य उदिष्ठ हे, मतदारांना मतदार ओळखपत्र प्राप्त करण्यासाठी उशीर होणार नाही याची खात्री करणे आहे कारण फिज़िकल कार्ड छापण्यासाठी आणि ते मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी बराच वेळ लागतो.

 

८ ) डिजीटलॉकरमध्ये डिजिटल मतदार ओळखपत्र (e-EPIC)ठेवली जाऊ शकतात.

 

९ ) डिजिटल (e-EPIC)कार्डवर एक सुरक्षित क्यूआर कोड असेल.

 

डिजिटल मतदार ओळखपत्र (e-EPIC) डाउनलोड कसे करावे?

 

१ ) https://voterportal.eci.gov.in/ वर लॉग ऑन करा किंवा या लिंक वर क्लिक करा.

 

२ ) डाउनलोड ई-ईपीआईसी e-EPIC पर्यायावर क्लिक करा.

 

३ ) १ फेब्रुवारी २०२१ पासून डाऊनलोडची सुविधा सर्वांसाठी उपलब्ध असेल.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here