आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

पारंपारिक भारतीय बैठकीत जमिनीवर बसून जेवण्याचे फायदे तुम्हाला माहित असायला हवे.!


आपल्या घरातील बुजुर्ग नेहमीच सांगतात कि त्यांच्या वेळी ते जमिनीवर बसून जेवण करायचे, त्यांची गोष्ट ही खुप निराळी होती आणि तो काळही तसाच होता. आजही खेड्यापाड्यात जमिनीवर बसून भारतीय बैठकीतच भोजनाचा आस्वाद घेतला जातो. शहरातही काही ठराविक धार्मिक कार्यक्रमात किंवा अन्य प्रसंगी जमिनीवर बसून जेवण केले जाते.

यामध्ये आपली काहीच चूक नाही कारण आजच्या या काळात असा एकही परिवार सापडणे कठीण आहे ज्याठिकाणी जमिनीवर बसून एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला जातो. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जमिनीवर बसून भारतीय बैठकीत जेवण करण्याचे फायदे. हे फायदे कळाल्यानंतर तुम्हीही दररोज जमिनीवर खाली बसून जेवण करण्यास
सुरु कराल हे मात्र नक्की…


हेही वाचा…

new google

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!


जमिनीवर

 

जमिनीवर बसून जेवण्याचे फायदे.

१ ) पाचन सुधारण्यास मदत.

आपण जेंव्हा जमिनीवर खाली बसून जेवण करतो त्यावेळी आपण खाल्लेले अन्न पचनास मदत होते, आणि तुमची पचन शक्ती सुधारते.

२ ) वाढत्या वजनावर अंकुश.

जेंव्हा तुम्ही मांडी घालून खाली बसता आणि त्याच स्थितीत जेवण करता त्यावेळी तुमचे पूर्ण लक्ष भोजनावर केंद्रित असते त्यामुळे तुमचे वाढते वजन थांबण्यास मदत होते.

३ ) हृदयाचे आरोग्य.

जेंव्हा आपण जमिनीवर खाली बसून जेवण करतो त्यावेळी, आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो, आणि यामुळे ह्रदय, पचन प्रक्रियेत सामील असाणाऱ्या अवयवांना रक्तपुरवठा आरामात होतो. याउलट खुर्चीवर बसून जेवण केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होत नाही.

जमिन

४ ) आयुष्य वाढते.

जमिनीवर बसून जेवण केल्यास आपले आयुष्य वाढण्यास मदत होते कारण आपण ज्या मुद्रामध्ये बसून जेवण करतो तिला योगामध्ये सुखासन म्हणतात आणि आपण दररोज सुखासन केल्याने शरीर लवचिक राहते आणि उठण्या बसण्याकरिता सहर्याची गरज भासत नाही.

५ ) पोटाचे स्नायू सक्रीय राहतात.

जेंव्हा आपण जमिनीवर बसून जेवण करतो त्यावेळी, अन्नाचा घास तोंडात घेण्यासाठी पुढच्या दिशेला झुकतो ज्यामुळे पोटाचे स्नायू सक्रीय राहतात.

६ ) आवश्यकते पुरतेच जेवण.

जेंव्हा आपण जमिनीवर बसून जेवण करतो त्यावेळी आपल्या पायाची आणि पोटाची मुद्रा अशा प्रकारची बनते कि आपल्याला कमी अन्नामध्ये तृप्त झाल्यासारखे वाटू लागते. यामुळे आपण जास्त भोजन करू शकत नाही आणि आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

हे होते जमिनीवर बसून भारतीय बैठकीत जेवण करण्याचे फायदे. तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल नक्कीच आपल्या मित्रांसोबत शेअर करा.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. अधर्माची साथ दिल्यामुळे या योद्ध्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते

व्हिडीओ प्लेलीस्ट:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here