आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

कँसरला दूर ठेवण्यासाठी खा हे पदार्थ.!

 

कँसर हा जगातील सर्वात भायावह रोगांपैकी एक आहे. असे अनेक कारणे आहेत ज्यामुळे तुमच्या शरीरात कँसर होऊ शकतो. यापैकी काही कारणे हे तुमच्या खान पाना संबंधित असू शकतात, किंवा हे कारणे अनुवांशिक सुद्धा असू शकतात.

 

new google

कँसर केंव्हा, कधी आणि कोणाला होईल याचा काही नेम नाही, परंतु निसर्गामध्ये असे अनेक पदार्थ आहेत ज्यामुळे कँसर हमेशासाठी दूर होऊ शकतो. खालील पदार्थांचे सेवन केल्यास कँसर हा आजार होऊ शकत नाही.

 

१ ) पिपली

अमेरिकन शास्त्रज्ञांनी पिपली प्लांटमधून पीपरलॉन्ग्युमाइन नावाचा घटक शोधला आहे, ज्यामध्ये कर्करोगाविरोधी गुणधर्म असतात. पिपलीचे सेवन केल्याने प्रोस्टेट कँसर, स्तनाचा कँसर, फुफ्फुसांचा कँसर इत्यादी दूर होण्यास मदत होते. पीपली मुख्यता भारतात आढळते ती मसाल्यामध्ये आणि आयुर्वेदातही वापरली जाते.

 

कँसर

 

२ ) सफरचंद

सफरचंदामध्ये एपीकैटेचीन, एंथोसायानीन्स आणि ट्राईटेरपेनॉइड्स नावाचे तत्व असतात, जे एंटी ऑक्सीडेंट गुणांनी भरपूर असतात. सफरचंद खाल्याने कँसरचा धोका दुर होण्यास मदत होते. सफरचंदाची साल ही अधिक पोषक असते कारण त्यामध्ये 80% क्यूरेसटीन असतो. स्तनाचा कँसर आणि फुफ्फुसांचा कँसर यावर सफरचंद आतीशय गुणकारी आहे.

 

३ ) ब्लूबेरी

ब्लूबेरी या फळामध्ये खूप जास्त प्रमाणात एंटीऑक्सीडेंटची मात्रा असते हे रेडिकल्समुळे डीएनए ला होणाऱ्या नुकसानीपासून वाचवते. ब्लूबेरी खाल्याने तोंडाचा कँसर, स्तनाचा कँसर आणि प्रोस्टेट कँसरच्या
पेशीची वाढ होण्यापासून थांबवते.

 

४ ) ब्रोकली, पत्ता आणि फूल गोभी

ब्रोकली, पत्ता आणि फूल गोभी यामध्ये असलेले ग्लूकोसाइनोलेट्स खाल्याने आइसोथायोसाइनेट आणि इनडोल्स मध्ये परावर्तीत होतो. या घटकांमुळे सुजन कमी होण्यास मदत मिळते. शरीरात येणारी सुजन ही कँसरला जन्म देऊ शकते. या भाज्यांमुळे पेशीचे विभाजन नियंत्रित होण्यास मदत मिळते.

 

५ ) चेरी

चेरी हे फळ फाइबर, विटामिन सी आणि पोटेसियमचे चांगले स्त्रोत आहे. चेरीचा गडद लाल रंग एंथोसायनिन्समुळे असतो. ह्या तत्वामध्ये भरपूर प्रमाणात एंटीऑक्सीडेंट ची मात्रा असते. म्हणून हे फळ कँसर साठी खूप गुणकारी आह

 

६ ) ग्रीन टी

चहाचा वापर हा प्राचीनकाळापासून एक रिफ्रेशिंग पेय आणि औषध म्हणू केला जातो. चहामध्ये पॉलीफेनॉल्स आणि फ्लैवोलॉइड्स सारखे तत्व आढळतात, हे तत्व एंटीऑक्सीडेंटनी भरपूर असतात. हे तत्व काळ्या चहापेक्षा ग्रीन टी मध्ये जास्त प्रमाणात असतात.

 

हे सार्व पदार्थ ज्यांच्या सेवनाने कँसर दूर होऊ शकतो ही बाजारात साहज उपलब्ध होतात, यासाठी आपल्याला जास्त खर्च सुद्धा होत नाही. व्यवस्थित खान पान, नियमित व्यायाम आणि स्वच्छ राहणीमान यामुळे आपण कँसरपासून दूर राहू शकतो.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here