आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

प्लास्टिक सर्जरी ही प्राचीन भारतीय वैद्यांनी जगाला दिलेली अनमोल भेट आहे.!

 

तुम्हाला माहिती आहे का? संपूर्ण जगात महागडी समजल्या जाणारी प्लास्टिक सर्जरी ही भारताची देन आहे. आज आपण जाणून घेऊया भारतातील वैद्यांनी अविष्कार केलेली प्लास्टिक सर्जरी जगभरात कशी पोहचली याबद्दल…

 

new google

हैदर आली बद्दल तर आपल्या सर्वांनाच माहिती असेल, दक्षिण भारतातील पराक्रमी व्यक्तिमत्व असलेल्या हैदर आली यांनी इंग्राजांना नाकेनवू करून सोडले होते. इस १७८० ते १७८४ या काळात इंग्रजांनी हैदर आली यांच्यावर अनेक वेळा हल्ले केले होते. इंग्राजांनी केलेल्या हल्ल्यांना प्रत्येक वेळी हैदर अली यांनी चोख उत्तर दिले होते. हैदर अलीचा इतिहास आहे कि,
त्यांना इंग्रज कधीच पराभूत करू शकले नव्हते.

 

प्लास्टिक सर्जरी

 

हैदर अली आणि कर्नल कुट यांची टक्कर.

 

कर्नल कुटच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी हैदर आली यांच्यावर वेळोवेळी हल्ले चढवले होते, या हल्ल्यांना कंटाळून हैदर आली यांनी कर्नल कुटचे नाक कापले होते. कापलेले नाक हातात देऊन त्यांनी कर्नल कुटला सोडून दिले होते. आपले कापलेले नाक हातात घेऊन कर्नल कुट कर्नाटकाच्या बेळगाव जिल्ह्यात येऊन पोहचले होते.

 

बेळगावला पोहचल्यावर त्याला एका भारतीय आयुर्वेदाचे ज्ञान असलेल्या वैद्याने बघितली आणि विचारले कि तुझे नाक कसे कापल्या गेले? लाजेने कर्नल कुट याने खोटे खोटे सांगितले कि, माझे नाक एका माणसाने चुकून दगड मारल्यामुळे कापल्या गेले आहे.

 

परंतु समोरील व्यक्ती चांगला वैद्य होती म्हणून त्याने ओळखले कि नाक हे तलवारीने कापण्यात आले आहे. कर्नल कुटला सत्य काय आहे असे विचारल्यावर त्याने सांगितले कि त्याचे नाक हे हैदर अलीने कापले आहे. त्यावेळी वैद्याने त्याला विचारले कि, आता हे कापलेले नाक घेऊन तू इंग्लंडला परतणार आहेस का?

 

यावर कार्नलने सांगितले, असे बेअब्रू होऊन मायदेशी जाऊ शकत नाही परंतु यावर काहीच इलाजही नाही. अशा वेळी भारतीय वैद्याने त्याला सल्ला दिला कि तू काही द्दिवस माझ्याकडे उपचार घे आणि मी तुझे नाक ठीक करून देतो, यावर सर्वप्रथम कर्नलला विश्वासच बसला नाही.

 

वैद्याने काही दिवस कर्नलच्या तुटक्या नाकावर उपचार केले आणि त्याचे नाक हे पूर्वीसारखे झाले होते. काही दिवस नाकावर लावण्यासाठी औषध घेऊन कर्नल इंग्लंडला रवाना झाला. या घटनेच्या तीन महिन्यानंतर ब्रिटीश पार्लमेंटमध्ये भाषण देत असताना कर्नल कुटने सर्वांना विचारले कि माझे नाक कापलेले आहे का? त्यावर सर्वांनी उत्तर दिले नाही.

 

कर्नलने आपल्यावर ओढवलेल्या सर्व प्रसंगाचे वर्णन सर्वांसमोर केले. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या एकही व्यक्तीला विश्वास होत नव्हता कि तुटलेले नाक परत जुटू शकते आणि प्लास्टिक सर्जरी नावाची कोनती प्रक्रिया अस्तित्वात आहे.

 

या प्रकरणाची सत्यता तपासून पाहण्यासाठी इंग्रजांची एक टीम भारतात आली आणि बेळगावच्या त्या वैद्याला भेटली ज्यांनी कर्नल कुटवर उपचार केले होते. वैद्याला जेंव्हा इंग्रजांनी प्लास्टिक सर्जरी बद्दल विचारले तेंव्हा त्यांनी सांगितले कि, प्लास्टिक सर्जरी काय आहे ते आम्हाला माहिती नाही परंतु असा उपचार तर आमच्या गावातील सर्वच वैद्य करतात.

 

हे प्रशिक्षण कोण देते याबद्दल इंग्रजांनी वैद्याला विचारले तेंव्हा त्यांनी सांगितले कि, आमच्या देशात आसलेल्या प्रत्येक
गुरुकुलामध्ये याबद्दलचे प्रशिक्षण दिले जाते.

 

या घटनेनंतर बऱ्याच इंग्रजांनी भारतीय गुरुकुलांमध्ये प्रवेश घेतला आणि प्लास्टिक सर्जरीचे प्रशिक्षण मिळवले. यानंतर प्लास्टिक सर्जरीचा प्रसार हा संपूर्ण जगभरात झाला होता. अशा प्रकारे भारतीय प्राचीन वैद्यांनी अविष्कार केलेल्या उपचार
पद्धतीला प्लास्टिक सर्जरीचे नाव देऊन पसरवण्यात आले.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here