आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

कृषी कायद्याच्या विरोधात ट्वीट करणारी रिहाना आहे तरी कोण.?

 

आपल्या देशात सध्या तीन नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. आता या आंदोलनकारी शेतकऱ्यांना सपोर्ट करण्यासाठी आता इंटरनेशनल सिंगर रिहाना समोर आली आहे, आणि तिच्या या उघड ट्वीटमुळे या प्रकरणाला आता वेगळीच दिशा मिळाली आहे. रीहानाच्या एका ट्वीटमुळे देशात सर्वत्र हंगामा झाला आहे.

 

रीहानाला तिच्या या ट्वीटमुळे कंगना राणावतने चांगलेच खरे खोटे सुनावले आहे. रीहानाला संपूर्ण जगातील लोक तिच्या गाण्यांसाठी ओळखतात परंतु या एका ट्वीटमुळे तिचे नाव भारतात अचानकच गुगलवर सर्च केले जात आहे. तुम्ही पण रीहानाबद्दल जाणून घेण्यास इच्छुक असाल तर मग हा लेख तुमच्या खूप फायद्याचा ठरणार आहे.

 

रीहाना

 

रीहानाचे प्रकरण नेमके आहे तरी काय?

 

पॉप सिंगर रिहानाने ट्विटरवर शेतकऱ्यांना समर्थन करत लिहिली होते कि, आपण या प्रकारणावर चर्चा का करत नाहीत? यानंतर अनेक दिग्गज व्यक्तींनी याबद्दल बोलण्यास सुरू केले आहे.

 

परंतु आभिनीत्री कंगना राणावत हिने याबद्दल एक विवादित ट्वीट केले आहे ( ही गोष्ठ तिच्यासाठी काही नवीन नाहीये ) तिने लिहिले आहे कि, कोणीही याबद्दल बोलत नाहीत कारण ते शेतकरी नसून आतंकवादी आहेत. आणि हे लोक भारताला विभाजण्याचे काम करत आहेत. यासोबतच तिने रीहानाला बेवकूफ असेही म्हटले आहे.

 

कोण आहे रिहाना?

पॉप सिंगर रिहानाचे पूर्ण नाव आहे रोबीन रिहाना फेंटी. तिचा जन्म २० फेब्रुवारी १९८८ मध्ये बारबाडोस मध्ये झाला आहे. वयाच्या १६ व्या वर्षी सिंगर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारी रिहाना सर्वात श्रीमंत (Richest Musician) संगीतकार आहे.

 

फोर्ब्सच्या माहितीनुसार तिची संपूर्ण संपत्ती ही 600 मिलियन डॉलर म्हणजे ४४०० करोड रुपये एवढी आहे. रिहाना ने Ocean’s 8 आणि Guava Island यासारख्या चित्रपटातही काम केले आहे. एक्टिंग आणि सिंगिंग याव्यतिरिक्त रीहानाचा Fenty नावाचा एक फैशन ब्रँड सुद्धा आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here