आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

शिक्षणासाठी काहीपण…

 

कोरोनामुळे शाळा आणि महाविद्यालये अद्यापाही पूर्णतः सुरु झालेली नाहीत अभ्यासक्रम आता ऑनलाइन झाला आहे. भारतातील प्रत्येकालाच इंटरनेट आणि ते वापरण्याचे साधने मिळतील असे काही नक्की नाही. देश या महामारीतून सावरत आहे.

 

new google

आणि या परिस्थितीत मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील काही लहान मुलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शाळा बंद आहे आणि हातात पाटी किंवा वही नसल्यामुळे या मुलांनी चक्क डांबरी रोडचा वापर स्लेट किंवा फळा म्हणून करायला सुरुवात केली आहे.

 

शिक्षण

 

बैतुल जिल्ह्यातील सिमोरी नावाच्या गावातील मुळे आता सामुहिक वर्गात जात आहेत, ‘learn with fun’या सूत्राद्वारे मुळे आता रोडला फळा म्हणून त्यावर लिहून शिक्षण घेत आहेत.

 

विशेष म्हणजे या गावात रोज सायंकाळी मुले एकत्र जमतात आणि खेळण्याव्यतिरिक्त बेसिक गणित आणि बाकी काही गोष्ठी शिकतात. गणितांचा सराव करण्यासाठी ते आता रोडचा वापर करू लागले आहेत.

 

याठिकाणी जमलेली मुले वाचन लेखन आणि बाकी अभ्यास करण्यासाठी जमतात आणि मग, लेखन, इंग्रजी लेखन, संज्ञा, गणित इत्यादीचा सराव रोडवर करतात. सायंकाळचे हे दृश्य बघून कोणीही हैराण झाल्याशिवाय रहात नाही.

 

आपल्या घरी किंवा सामुदायिक वर्गात जे काही शिकवले जाते त्या सर्व गोष्ठी याठिकाणी ही मुले रोडवर लिहितात आणि त्याचा सराव करतात. केवळ मनोरंजन म्हणून लिहिणाऱ्या या मुलांचे लेखन कौशल यामुळे खूप सुधारत आहे. जेंव्हा कधी एखादे मुल या रस्त्यावरून जाते तेव्हा हे लिहिलेले एक सराव करण्यासाठी खूप फायदेमंद ठरते. याठिकाणी सर्व लहान मुलांना ही संकल्पना खूप आवडली आहे.

 

शिक्षण आणि खेळ एकाच ठिकाणी 

याठिकाणी राहणारे शिक्षक शैलेंद्र बिहारी हे म्हणतात कि, हा रोड मुलांसाठी केवळ खेळण्याची जागा होती. याठिकाणी खाली वेळेला मुले सायकल किंवा अन्य खेळ खेळायचे. आता  त्यांचे खेळणे आणि शिक्षण हे एकाच ठिकाणी एकत्रित करण्यात आले आहे.

 

स्थानिक स्वयंसेवी संस्थेच्या सदस्या ममता गोहर म्हणतात आम्ही मुलांना पांढऱ्या रंगाचे खडू हे मोफत वाट्त आहोत, ही नवीन संकल्पना आता त्या पारीसरात सर्वत्र पसरू लागली आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here