आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

अरबपती असूनही रतन टाटा यांनी लग्न का नाही केले? अखेर त्यांनीच केला खुलासा.!

 

टाटा समूहाचे पूर्व चेअरमन श्री रतन टाटा यांनी आजपर्यंत लग्न केलेले नाही. कधीकाळी रतन टाटा यांना सुद्धा प्रेम झाले होते. एका मुलाखतीमध्ये त्यांनी स्वतःच याबद्दल खुलासा केला होता. रतन टाटा यांना त्यांच्या जीवनात चार वेळेस प्रेम झाले होते. परंतु खराब परिस्थितीपुढे त्यांचे नाते कमजोर पडले होते. आज आपण जाणून घेऊया उद्योगपती भारताची शान मानल्या जाणाऱ्या रतन टाटा यांच्या लव लाईफ बद्दल….

 

new google

रतन टाटा

 

रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ मध्ये गुजरातच्या सुरत शहरात झाला होता. रतन टाटा यांनी आपली स्वताची अलगच ओळख बनवली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा ग्रुपने गगनभरारी घेतली आहे. व्यावासायात रतन टाटा यांनी खूप नाव कमावले आहे परंतु प्रेमाच्या बाबतीत ते खूप असफल झाले आहेत.

 

एका टीवी वाहिनीवर मुलखाती दरम्यान रतन टाटा यांनी आपल्या लव लाईफबद्दल खुलासा केला होता. त्यांनी स्पष्टपणे संगीताले होते कि, “मला प्रेम झाले होते परंतु माझ्या प्रेमाला मी लग्नापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालो नाही”. रतन टाटा म्हणतात कि, दुरचा विचार केला तर अविवाहित राहणे हे त्यांच्यासाठी फायद्याचे राहिले आहे कारण, जर त्यांनी त्यावेळी लग्न केले असते तर आजची त्यांची परिस्थिती फार बिकट राहिली असती.

 

रतन टाटा यांना चार वेळा प्रेम झाले होते आणि ते लग्न करण्यापर्यंत गंभीर झाले होते परंतु प्रत्येक वेळी काही न काही कारनांमुळे त्यांनी माघार घेतली होती. रतन टाटा अमेरिकेत असताना त्यांनी लग्न करण्याचा पक्का विचार केला होता परंतु यावेळी त्यांचे लग्न केवाल यामुळे झाले नाही, ते भारतात परत आले होते, आणि त्यांची प्रेमिका ही भारतात येण्याच्या विरोधात होती, शेवटी त्यांच्या प्रेमिकेने एका अमेरिकेतच राहणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न केले.

 

तुम्हाला ज्या व्यक्तीवर प्रेम जडले होते ती व्यक्ती याच शहरात राहते का? असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी होकार दिला परंतु यावर जास्त बोलण्यास त्यांनी नकार दिला होता.

 

रतन टाटा यांचा जन्म एका चांगल्या समृध्द परिवारामध्ये झाला होता, परंतु त्यांचे जीवन त्यामानाने खूप कठीण राहिलेले आहे. जेंव्हा ते ७ वर्षांचे हिते त्याचवेळी त्यांना आपल्या आई वडिलांपासून अलग व्हावे लागले होते. त्यांचे संगोपन हे त्यांच्या आजीने केले होते.

 

रतन टाटा यांना महागड्या कारींचा छंद आहे, त्यांच्या नेतृत्वाखालीच टाटा समूहाने खूप प्रगती केली आहे, त्यांनी लँड रोवर, रेंजरोवर, जग्वायार ह्या गाड्या बनवल्या आहेत. सर्वसामान्य भारतीय परिवाराचे कार खरेदी करण्याचे स्वप्न त्यांनीच टाटा नँनो च्या सहायाने पूर्ण करून दाखवले.

 

भारत सरकारने रतन टाटा यांना पद्म भूषण(२०००) आणि पद्म विभूषण (२००८) हे अतिशय मानाचे पुरस्कार देऊन गौरवीत केले आहे. हे पुरस्कार भारतातील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्य पुरस्कार आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here