आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब
==
नर्सरी च्या उद्योगातून वर्षाकाठी 20 लाखाचं उत्पन्न काढतोय भंडाऱ्याचा हा आदर्श शेतकरी.!
महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा आता काळानुसार आधुनिक होत आहे आणि यासाठी तो नवनवीन प्रयोगही करत आहे. असाच एक प्रयोग म्हणून सात वर्षांपूर्वी भंडाऱ्याचा राजू भोयर यांनी आपल्या अर्धा एकर जमिनीमध्ये नर्सरी सुरु केली होती. आज त्यांची हीच नर्सरी आजूबाजूला सात एकर जमिनीमध्ये पसरली आहे.
सुरुवातीला थोडीफार परेशानी झाली परंतु आज राजू भोयर यांना याच नर्सरी मधून वर्षाकाठी 20 लाखाचं उत्पन्न मिळतंय. वर्षभर खर्च केलेली रक्कम जर बाजूला काढली तर त्यांना १० ते १२ लाख रुपये वर्षाकाठी नफा होत आहे. नर्सरी मध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न आता मिटला आहे, कारण नर्सरीत त्यांना बाराही महिन्यासाठी कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे.
भंडाऱ्या जिल्ह्यातील पालोरा येथील रहिवाशी असलेल्या राजू भोयर यांच्याकडे वडिलोपार्जित केवळ अर्धा एकर जमीन होती. पारंपारिक पद्धतीने कितीही कष्ट करून पिक काढले तरी त्यांना हवे तसे उत्पन्न मिळत नव्हते. शेतीमध्ये उत्पन्न होत नाही त्यामुळे पेरणीसाठी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम वाढत होती. पारंपारिक पद्दत सोडून अलग काहीतरी करावे असा निश्चय करून राजू भोयर यांनी नर्सरी उद्योगात पाय ठेवला होता.
२०१३ मध्ये राजू भोयर यांच्या डोक्यावर सावकारी कर्जाचा डोंगर उभा राहिला होता, आता यापासून हमेशासाठी सुटकारा घ्यावा म्हणूनच त्यांनी आपल्या अर्धा एकर जमिनीवरच ओम नर्सरी ची सुरुवात केली. सुरुवातीला भोयर हे स्वतः अलग अलग ठिकाणी जाऊन फुलांची झाडे आणि रोपे विकत होते. आज त्यांची नर्सरी हि ७ एकर जमिनीमध्ये विस्तारली आहे.
त्यांच्या नर्सरी मध्ये ५० पेक्षा अधिक प्रकारच्या फुलांची आणि फळांची झाडे आहेत. काम वाढल्यामुळे त्यांनी आता आपल्याच गावातील ३५ लोक्कांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या नर्सरी मधील रोपांना आणि झाडांना आता विविध राज्यांमध्ये खास डिमांड आहे. अनेक ठिकाणाचे लहान मोठे व्यापारी त्यांच्याकडून रोपे आणि झाडे खरेदी करून नेत आहेत.
याविषयी अधिक माहिती देताना नर्सरी चे मालक म्हणजेच राजू भोयर सांगतात कि, आमच्या नर्सरीचा विस्तार आणखी सुरु आहे, केवळ अर्ध्या एकर जमिनीवर उभारलेला हा व्यवसाय आता ७ एकरावर पोहचला आहे आणि हा असाच वाढत राहणार आहे.
शेती आता आपल्याला परवडत नाही असशी सर्व शेतकऱ्यांची तक्रार असते परंतु भोयर यांच्यासारख्या आदर्श आणि होतकरू शेतकऱ्याला बघितल्यावर मनात विचार येतो, शेतीमध्ये आधुउनिक्क पद्धतीने नियोजित काम केल्यास शेतीतूनही लाखोंच उत्पन्न मिळवता येऊ शकते.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.