आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

एका ट्वीटमुळे काय हंगामा होऊ शकतो हे आपण मागील काही दिवसांपासून पाहत आहोत. एका ट्वीटने भारतातील झोपलेल्या लोकांना जाग आणली आहे, काही हिंदी चित्रपट जगातील कलाकार आहेत जे देशाच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचा आव आणतात त्यांना ट्वीट वर ट्वीट करण्यास भाग पाडले आहे या एका ट्वीटने, भारताच्या आंतरराष्ट्रीय मंत्रालयाला अचानक एक अध्यादेश काढण्यास भाग पाडले आहे या एका ट्वीटने. तुम्हाला समजलेच असेल कि मी बोलतोय त्या रीहानाच्या वादग्रस्त ट्वीट बद्दल ज्याने सगळ्या देशात हडकंप आणला आहे.

 

सध्या भारतातील शेतकरी हे सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत, या आंदोलनाची दखल जगभरातील मिडीयाने घेतली आहे. यावर अनेक ठिकाणाहून प्रतिक्रिया पण आल्या आहेत. परंतु सर्वात जास्त गोंधळ निर्माण केला तो सिंगर रीहानाच्या ट्वीटने. या ट्वीटने आपल्या देशातील सोशल आणि प्रिंट मिडीयाला काही दिवसांसाठी
चांगला कंटेंट दिला आहे, आणि त्याची प्रचीती तुम्हाला आलीही असेल. कारण काही लोक जे रीहानाणे ट्वीट करण्यापूर्वी शेतकरी आंदोलनाविषयी काहीच बोलत नव्हते त्यांनी पण या संदर्भात ट्वीट केले आहे.

 

ट्वीटर

 

रिहाना हि एक खूप प्रसिध्द सिंगर आहे, रीहानाचे सोशल मिडीयावर १०० मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. रीहानाने “Why aren’t we talking about this?असे ट्वीट #farmers protest म्हणून केले होते. त्यासोबत तिने एका बातमीची कटिंग शेअर केली होती ज्यामध्ये, भारताने दिल्लीच्या परिसरात इंटरनेट सेवा बंद केल्याचा उल्लेख केला होता.

 

तसे या ट्वीट मध्ये काही वाद निर्माण होण्यासारखे दिसत नाही, हे ट्वीट बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल कि, आपण यावर बोलत का नाहीत असेच ती विचारत होती. परंतु या एका ट्वीट मुळे काय गोंधळ झाला हे सर्वांनाच माहिती आहे. हजारो लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या यातील काही लोक तिच्या सपोर्टमध्ये होते तर काही लोक तिच्या विरोधात.

 

रीहानाला याची कल्पनाही नसेल कि हे शेतकरी कशासाठी आंदोलन करत आहेत, कारण आपल्याच देशातील बहुतांश लोकांना नवीन कृषी कायद्यात नेमक आहे काय हेच माहिती नाहीये. आंदोलनाची आताची परिस्थिती अशी आहे कि,
सरकारने दिल्लीच्या सीमेवर हजारोंच्या संखेने पोलीस तैनात केले आहेत. काही व्हिडीओ बघितल्यावर क्षणभर हा व्हिडिओ दिल्लीचा आहे कि भारत चीन सीमेवरचा असा प्रश्न मनात येतो.

 

कारण याठिकाणी हजारो बॅरीकेत्स आणि सिमेंटचे ब्लॉक लावून तटबंदी करण्यात आली आहे. काही ठिकाणी तर रस्ते खोदून ठेवले आहेत आणि काही ठिकाणी रस्त्यावर खिळे रोवले आहेत.प्रशासनाने हे आंदोलन थांबवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते, याठिकाणी पाणी आणि खाण्याच्या वस्तूचापुरवठा आणि विजेचा साप्लाई बंद करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला होता.

 

काही ठिकाणी सोशल मिडीयावर सरकारच्या विरोधात लिहिणाऱ्यांना anty national चा शिक्का मारण्यात येत आहे. anty national म्हणजे काय हेच आता काळात नाहीये कारण, सारकारच्या विरोधात अआवाज उठवानारा प्रत्येक व्यक्ती तर anty national होऊ शकत नाही. आता दुसरी बाजू बाघितली तर अभिनेत्री कंगना रानावत ने उघडपणे ट्वीट करुन्न लिहिले आहे कि याठिकाणी आंदोलान कारणारे ही शेतकरी नसून आतंकवादी आहेत.

 

प्रशासनाने तर कंगनाच्या या ट्वीट वर कारवाही करायला पाहिजे होती. सरकारने कारवाही केली आहे १० ते १५ ट्वीटर अकाऊंट बंद करण्यासाठी ट्वीटर कडे तक्रार करण्यात आली आहे, अरे भाई नाही यामध्ये कंगणाचे अकाऊंट सामील नाही. हे १५ अकाऊंट तर सरकारने शिक्का मारलेल्या, सो कॉल्ड anty national लोकांची आहेत.

 

रीहानाच्या एका ट्वीट मुळे भारतातील लोकांना खडबडून जागे केले आहे. आता सरकार यावर कोणता पर्याय शोधून काढते हि एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण एकीकडे सरकार म्हणते कि आम्ही शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यास तयार आहोत तर दुसरीकडे त्यांच्यासाठी जाणाऱ्या अन्न पाण्याचा पुरवठा बंद करत आहे. शेतकरी संघटनांचे ट्वीटर अकाऊंट बंद करण्यासाठी कोर्टात लढत आहे. यावरून सरकार कोणत्या मनस्थितीत आहे हे कळू शकते. या घटनेवर तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here