आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

उत्तराखंडमध्ये ग्लेशियर तुटून २०१३ च्या दुर्घटनेची पुनरावृत्ती?

 

उत्तराखंड मधील जोशीमठ याठिकाणी खूप मोठा हादसा झाला आहे. चामोली जिल्ह्यातील तपोवन परिसरात ग्लेशियर तुटून खूप मोठी हानी झाली आहे. शेकडो लोक या दुर्घटनेचा शिकार झाल्याचा अनुमान आहे तर अनेक लोक याठिकाणी फसले आहेत. या दुर्घटनेमुळे ऋषिगंगा पावर प्रोजेक्टला खूप नुकसान पोहचले आहे.

 

तपोवनाच्या एनटीपीसी (NTPC) साईटवर तीन मृतदेह मिळाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या मजदुरांसाठी बचाव सामग्री पाठवण्यात येत आहे. बचाव कार्य आणखी पण सुरूच आहे, आतापर्यंत याठिकाणी आठ लोकांचे मृतदेह सापडले आहेत.

 

उत्तराखंड

 

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी या या घटनेने प्रभावित झालेल्या दोन कंस्ट्रक्शन साइटवर काम करणाऱ्या कामगारांच्या सुराक्षतेसाठी राज्य पोलीस आणि आईटीबीपी च्या जवानांची तैनाती केली आहे. बचाव कार्य करत असताना आतापर्यंत दोन कामगारांचे मृतदेह सापडले असल्याचे सांगितले आहे.

 

उत्तराखंडचे मुख्य सचिव ओम प्रकाश यांनी याविषयी माहिती देताना सांगितले कि, एनडीआरफच्या टीम याठिकाणी पोहचल्या आहेत, त्यासोबातच आईटीबीपी आणि SDRF च्या टीम सुद्धा घटनास्थळी पोहचल्या आहेत. याठीक्कानी किती लोक या दुर्घटनेचे शिकार झाली आहेत असे विचारल्यावर त्यांनी सांगितले क्की १०० ते १५० लोक या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचा अंदाज आहे.

 

ग्लेशियर तुटून पडल्याने अलकनंदा आणि धौलीगंगा नदीमध्ये हिमस्खलन आणि पुरामुळे नदीपात्राच्या जवळील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे कार्य सुरु आहे. नाद्दीपात्राच्या जवळील अनेक घरे वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आईटीबीपी चे जवान बचाव करण्यासाठी पोहचले आहेत आणि अन्य मद्त साहित्य याठिकाणी पोहचवले जात आहे. या दुर्घटनेसाठी र्पूर्ण मदत क्कारण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित सहा यांनी केली आहे.

 

राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी जनतेला आवाहन केले आहे कि, कोनोही जुनी व्हिडिओ शेअर करून भीतीचे वातावरण तयार करू नये. तसेच मुख्यमत्री स्वतः घटनास्थळी पोहचले आहेत.

 

ANI च्यानुसार नंदा देवी राष्ट्रीय पार्कपासून निघणाऱ्या ऋषिगंगा नदीच्या प्रवाहात हिमखंडामुळे पुराची स्थिती निर्माण झाली आहे. धौलगंगा घाटी आणि अलकनंदा घाटीमध्ये नदीने विक्राळ रूप धारण केले आहे. यामुळे दोन नद्याच्या संगमावर वसलेल्या रैणी गावाजवळील श्रृषिगंगा वीज प्रकल्पाला खूप नुकसान पोहचले आहे.

 

प्रत्यक्षदर्शी लोकांच्यानुसार सकाळी अचानक जोराचा आवाज ऐकू आला आणि मग काही वेळातच नदीचे जलस्थर वाढताना दिसून आले. काही वेळाने तर या नदीचे पाणी अक्राळ विक्राळ रूप घेऊन आपल्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक वस्तूला आपाल्या प्रवाहात सामावून घेत होती.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here