आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब
===
आयपीएल 13 मध्ये विराट कोहली किंवा धोनी नव्हे तर हा विदेशी खेळाडू विकल्या गेला होता सर्वात महाग.!
आयपीएल च्या १४ व्या हंगामासाठी आता तयारी सुरु झाली आहे. १८ फेब्रुवारी मिनी ऑक्शन IPL 2021 Mini Auction ठेवल्या जाणार आहे. या ऑक्शन मध्ये भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंनी आपली बेस प्राइज किती आहे ते बीसीसीआईला कळवले आहे. आता त्यांच्या या बेस प्राइजपासून त्यांच्यावर बोली लागणार आहे. भारताचे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सुद्धा या ऑक्शन मध्ये सहभागी होणार आहे.
कोरोनाच्या बिकट काळातही खेळवल्या गेलेल्या आयपीएल च्या 13 च्या हंगामात अनेक खेळाडूंवर अक्षरश पैश्याचा पाऊसच पडला होता. भारतीय खेळाडू महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांना पछाडत ऑस्ट्रेलियाचा बॉलर पैट कमिंस हा खेळाडू सर्वात महाग विकल्या गेला होता. आज आपण जाणून घेऊया अशाच महाग विकल्या गेलेल्या काही विदेशी खेळाडूंबद्दल….
आयपीएल २०२० मध्ये पैट कमिंस हा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता, पैट कमिंसला कोलकत्ताच्या टीमने १५ कोटी ५० लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते. या हंगामात पैट कमिंसने १६ मॅचमध्ये १७ विकेट घेतल्या होत्या. पैट कमिंस आयपीएल च्या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे.
किंग्स इलेवन पंजाब या टीमने त्यांच्या स्टार खेळाडू असलेल्या ग्लेन मैक्सवेलला १०.७५ कोटी रुपयांमध्ये कारेडी केले होते. ग्लेन मैक्सवेलची बेस प्राइज केवळ 2 कोटी रुपये होती. परंतु ऑक्शन मध्ये त्यांचा भाव वाढला आणि आपल्या जुन्या खेळाडूला पंजाबाने रिटेन केले.
दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू क्रिस मॉरिसला रॉयल चैलेंजर्स बैंगलोर या टीमने १० कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते, या खेळाडूची बेस प्राइज हि केवळ 1.५ कोटी एव्हढीच होती. पारान्तु या खेळाडूवर जास्त विश्वास दर्शवत त्यांनी त्याला १० रुपयांमध्ये आपल्या संघात सामील केले.
वेस्टइंडीजचा तेज बॉलर शेल्डन कॉट्रेल याने प्रथमच आयपीएल मध्ये भाग घेतला होता. पंजाबच्या टीमने या खेळाडूवर विश्वास दर्शवत ८.५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते, या खेळाडूची बेस प्राइज हि केवळ ५० लाख रुपये होती.
आयपीएल च्या मागच्या सत्रात बॉलरची खास डिमांड होती. ऑस्ट्रेलियाचा तेज बॉलर नाथन कूल्टर नाइल याला मुंबईच्या टीमने ८ कोटी रुपयांमध्ये खरीदी केले होते. केवळ 1 कोटी बेस प्राइज असलेल्या या खेळाडूला आपल्या टीममध्ये सामील करण्याचा निर्णय खरा ठरला आणि त्याने २६ मॅचमध्ये ३६ विकेट घेतल्या होत्या.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved