आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

10 ग्रामीण महिला उद्योजक ज्या अमूल दूध विक्री करुन करतात लाख़ोंची कमाई !

 

भारतात दुधाचा व्यवसाय हा एक महत्त्वपूर्ण व्यवसाय आहे. दुधाचा व्यवसाय सुरू करणे निश्चितच एक मोठी गोष्ट आहे कारण उत्पादनास नेहमीच मोठी मागणी असते. गुजरातच्या या महिलांनी तेच सिद्ध केले आहे. दुधाची विक्री करुन अनेक महिला लक्षाधीश झाल्या आहेत.

 

new google

अमूल

 

अमूल डेअरीचे अध्यक्ष आर.एस. सोधी यांनी बुधवारी आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये अमूलला दूध विक्री करुन लाखो रुपये मिळवणारया दहा ग्रामीण महिला उद्योजकांची यादी जाहीर केली. या सर्व महिला दुग्धशाळा आणि पशुपालन व्यवसायात गुंतल्या आहेत. आर.एस.सोधी यांनी ट्वीट केले की या महिला उद्योजकांनी २०१९-२० दरम्यान दूध विकुन कोट्यावधी रुपयांची कमाई केली.

 

 

1. पहिल्या स्थानावर चौधरी नवलबेन यांनी 2019-20 मध्ये  221595.6 लीटर दूध विकून 87,95,900.67 रुपये मिळवले आहेत.

 

2. दुसर्‍या क्रमांकावर मालवी कानुबेन रावतभाई असून, त्यांनी 250745.45 दुधातुन 73,56,615.03 रुपये मिळवले.

 

3. तिसरया क्रमांकावर चवडा हंसाबा हिम्मतसिंग आहेत. त्यांनी 268767 लीटरदूध संकलन केले आणि 72,19,405.52 रुपये उत्पन्न मिळवले.

 

4. चौथ्या क्रमांकावर लोह गंगाबेन गणेशभाई आहेत, ज्यांनी 199306 लीटर दुधापासून 64,46,475.59 रुपये मिळविले आहेत.

 

5. पाचव्या क्रमांकावर रवाडी देवीकाबेन आहेत, ज्याने 179632 लीटर दुधामधून 62,20,212.56 रुपये मिळवले आहेत.

 

6. सहाव्या क्रमांकावर लीलाबेन राजपूत असून, त्यांनी 225915.2 लीटर दूध विक्री करुन 60,87,768.68 रुपये मिळवले.

 

7. सातव्या क्रमांकावर बिस्मिलाबेन उमटिया आहेत, ज्यांनी 195909.6 किलो दुधापासून 58,10,178.85 रुपये मिळविले.

 

8. आठव्या क्रमांकावर सजीबेन चौधरी आहेत, ज्याने अमूलला 196862.6 लीटर दूध विकले आणि 56,63,765.6.8 रुपये मिळवले.

 

9. नफिसाबेन अग्लोडिया 9 व्या क्रमांकावर आहेत, ज्याने 195698.7 लीटर दुधापासून 53,66,916.64 रुपये उत्पन्न मिळवले.

 

10. शेवटी, दहाव्या क्रमांकावर लीलाबेन धुलिया आहेत, ज्यानी 179274.5 लीटर दूध संकलन केले आणि 52,02,396.82रुपये मिळवले.

ही आहे ग्रामीण महिला उद्योजीकांची टॉप 10 यादी जी अमुल कडून जाहिर केली गेली आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here