आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

आपल्या नवरीला घरी नेण्यासाठी नवरदेव आला हेलिकॉप्टरने, परंतू परतताना हेलिकॉप्टरचे पेट्रोलच संपले.!


 

आपाल्या जीवनात लग्न हे केवळ एकदाच होत असते आणि या क्षणाला यादगार बनवण्यासाठी अनेक जन काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात. काही जन यामध्ये सफल होतात आणि काही जणांची मात्र चांगलीच फजिती होते याची प्रचीती आली ती हरियाणाच्या या दोन अनोख्या लग्न समारंभात.

 

new google

हरियानामध्ये दोन अलग अलग ठिकाणांहून दोन नवरदेव आपल्या नवरीला आपल्या घरी आणण्यासाठी हेलिकॉप्टरने रवाना झाले होते, परंतु एक नवरदेव व्यवस्थित पोहचला आणि एकाची मात्र चांगलीच फजिती झाली. लग्न स्थळी पोहोचताच त्या हेलिकॉप्टरचे इंधनच संपले आणि पुढे जे काही घडले ते तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही.

 

हेलिकॉप्टर

 

पहिल्या घटनेत, लग्नात राजेशाही थाट मिरवण्यासाठी नवरदेव पानिपत येथून रवाना झाला होता. पानिपतचे रहिवाशी असलेले अश्वनी हे नारनौल येथे निघाले होते. नवरीला सासरी नेण्यासाठी हेलिकॉप्टर आल्याची खबर मिळताच तेथील लोकांनी मार्केटच्या मैदानात गर्दी केली होती.

 

वरपिता सीताराम यांनी सांगितले कि त्यांच्या एकुलत्या एक मुलाची पत्नी हि हेलिकॉप्टरमधूनच आपल्या घरी आणावी असे त्यांचे स्वप्न होते. त्यांचे स्वप्न साकार होताना बघून ते खूप खुश होती, त्यांच्यासोबतच नवरी मुलगी सुद्धा अतिशय खुश होती.

हेलिकॉप्टर

आपण अनेकदा बाईक किंवा स्कूटरचे पेट्रोल संपल्याचे एकले असेल, परंतु या दुसऱ्या घटनेत महम याठिकाणी दुसऱ्या नवरदेवाच्या हेलिकॉप्टरचे तेलच संपले. झाले असे की, महम येथील रहिवाशी असलेला मुलीचे लग्न हे पलवलचे राहिवशी असलेल्या राहुल सोबत ठरले होते. लग्नाच्या दिवशी राहुल लग्नस्थळी पोहचण्यासाठी हेलिकॉप्टरने रवाना झाला.

 

जात असताना हेलिकॉप्टरच्या पायलट ने सांगितले कि पेट्रोल कमी आहे. कसेबसे त्या हेलिकॉप्टरला खाली उतरवले आणि एका तेलाच्या टँकर ची व्यवस्था करण्यात आली आणि त्यानंतर मग हेलिकॉप्टर समोर रवाना झाले आणि बाकीची वरात हि अन्य वाहनांनी लग्नाच्या ठिकाणी पोहचली.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here