आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

आयपीएल निलामी सत्रापूर्वी पंजाब च्या टीममध्ये होताहेत हे मोठे बदल.

 

आयपीएल २०२१ साठी सर्व टीमची तयारी जोमाने चालू आहे. आता एक बातमी नव्याने आली आहे कि, या निलामी सत्राच्या पूर्वी पंजाबची टीम किंग्स ११ पंजाब हि आपले नाव आणि लोगो बदलणार आहे. याविषयीची अधिकृत घोषणा टीमच्या व्यवस्थापनाकडून १७ फेब्रुवारीला केली जाऊ शकते असा अनुमान वर्तवण्यात येत आहे.

 

पंजाब

 

१८ फेब्रुवारीला आयपीएल च्या नवीन सत्रासाठी मिनी ऑक्शन होणार आहे. अभीनेत्री प्रीती जिन्टाच्या मालकीची असलेल्या पंजाब टीमचा लोगो आणि नाव नेमके कोणत्या कारणामुळे बदलण्यात येत आहे याबद्दल सविस्तर माहिती मिळाली नाही. परंतु काही लोकांच्या मते, पंजाब टीम आजपर्यंत एकही सत्र जिंकू शकली नाही यामुळे हा निर्णय घेण्यात येत आहे.

 

के एल राहुलच्या नेत्रीत्वाखाली या सत्रातील पंजाबची टीम नवीन जोस्शात मैदानात उतरताना दिसणार आहे. अशी चर्चा आहे कि, मिनी ऑक्शनपूर्वी प्रीती आपल्या टीमचे नाव आणि लोगो सर्वांपुढे अनु शकते, काही लोकांच्या मते तर प्रीती आपल्या गुडलक साठी हे बदल करत आहे.

 

आजपर्यंत पंजाब तीमने १३ सत्र खेळले आहेत परंतु एकाही सत्रात त्यांना जीत विजेत्ता बनता आलेले नाहीये. या टीमजवळ आता आणिक कुंबळे सारखे दिग्गज कोच आहेत. त्यासोबतच चांगले खेळाडू टीममध्ये असूनही त्यांचे प्रदर्शन चांगले राहिले नाही.

 

पंजाब टीमचे मालकी हक्क के प्रीती जिन्टा, मोहित बर्मन, कारण पाल आणि नेस वाडिया यांच्याकडे आहेत, परंतु मैदानात प्रीती जिन्टा आपल्या टीमला प्रोत्साहन देताना दिसते.

 

या सत्रात पंजाब ची टीम मोठ्या खेळाडूंवर बोली लाऊ शकते. कारण या फ्रैंचाइजी जवळच सर्वात जास्त रक्कम शिल्लक आहे. अत्त सर्वाची नजर पंजाबचा नवीन लोगो कोनता असेल याकडे लागले आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here