आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

IAS बनण्याचे स्वप्न तुटले, परंतु खचून न जाता मनोज आर्य यांनी निवडला नैसर्गिक शेतीचा पर्याय आता कमावातोय लाखो रुपये…

 

आपल्या जीवनात संघर्ष हा सुरूच असतो. कारण आपण आणिक स्वप्न बघतो त्यापैकी काही साकार होतात तर काही साकार होत नाहीत. परंतु सर्वात महत्वाच गोष्ट म्हणजे आपले एक स्वप्न तुटले म्हणून आपण खचून जाता कामा नये, एक स्वप्न तुटले याचा हा अर्थ कधीच होत नाही कि तुम्ही जीवनात सर्वत्र अयशस्वी झालात. करियर विषयी बोलायाचे झाले तर काही लोकांचेच स्वप्न ही १०० टक्के पूर्ण होऊ शकते, बाकीच्या लोकांना आपल्या मेहनतीने आणि समजुतीने दुसरा मार्ग शोधावा लागतो.

 

असाच आदर्श निर्माण केला आहे उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील ढिकाना गावातील रहिवाशी असालेल्या मनोज आर्य यांनी. मनोज आर्य एकावेळी IAS बनण्यासाठी खूप मेहनत करत होते, परंतु त्यांचे हे स्वप्न साकार होऊ शकले नाही. दिल्लीत राहताना त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यासमवेत अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला होता. एका वेळेला ते आरटीआय कार्यकर्ता पण राहिलेले आहेत.

 

मनोज आर्य

 

आता ह्या सर्व गोष्टी सोडून त्यांनी आपले पूर्ण लक्ष हे उसाच्या शेतीवर केंद्रित केले आहे. मनोज आर्य आपल्या शेतात उसाचे उत्पन्न घेतात आणि याच उसाचा ऑर्गेनिक पद्धतीने गुळ बनवतात. त्यांच्याद्वारे बनवलेल्या ऑर्गेनिक गुळाला मार्केटमध्ये खूप डिमांड आहे.

 

मनोज आर्य हे त्यांच्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी आदर्श बनले आहेत आणि अनेक शेतकरी त्यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येतात. स्वतः बनवलेल्या या ऑर्गेनिक गुळापासून मनोज आर्य यांना वर्षाकाठी सर्व खर्च निघून ८ ते १० लाख रुपये मुनाफा मिळत आहे.

 

मनोज आर्य यांना त्यांचा अनुभव विचारला असता ते म्हणतात कि, IAS बनणे हे त्यांच्या जीवनातील स्वप्न होते, १९९४-९५ मध्ये आपले शिक्षण पूर्ण करून त्यांनी सिविल सर्विसेज ची तयारी सुरु केली. अनेक वर्ष तयारी करूनही त्यांना यश मिळाले नाही, आता त्यांनी सामाजिक कार्यात लक्ष द्यायला सुरुवात केली होती. २००६ मध्ये ते अरविंद केजरीवाल यांच्या सोबत अनेक आंदोलनामध्ये सहभागी होते. जीवनात सर्व काही केल्यानंतर आज ते शेतीमध्ये खुश आहेत.

 

मनोज्ज आर्य हे आन्ना हजारे यांच्या आंदोलनातही सहभागी होते, आम आदमी पार्टीची स्थापना झाल्याच्या नंतरही कांही दिवस ते केजरीवाल यांच्यासोबत होते. आम आदमी पार्टीमध्ये अनेक पदांवर राहिल्यानंतरही त्यांची मन आता राजनीतीमध्ये लागत नव्हते. शेवटी त्यांनी २०१६ मध्ये राजनीतीला राम राम ठोकला, परंतु त्यांना पुढे काय करावे हे अद्यापही ठरवले नव्हते.

 

मनोज आर्य सांगतात कि त्यांचे वडील हे रिटायर्ड प्रिन्सिपल तर भाऊ हा दिल्लीत लेक्चरर आहे. दुसरा एक भाऊ हा बागपत मध्ये प्राथमिक शाळेत शिक्षक आहे, घरातील सर्व लोक हे शिक्षण विभागात कामाला आहेत. म्हणून त्यांचा संबंध कधीच शेतीशी आला नाही. सुरुवातीला त्यांनी सुद्धा शेतीमध्ये जास्त रुची घेतली नाही परंतु त्यांच्या एका मित्राने त्यांना एका शेती विषयक वाट्सऐप ग्रुपमध्ये अॅड केले. येथूनच त्यांना शेती करण्याची प्रेरणा मिळाली.

 

या शेती विषयक वाट्सऐप ग्रुपमध्ये शेती संबंधित माहिती आणि व्हिडिओ येत त्यातुन मनोज आर्य यांना खूप मदत मिळत होती. शेवटी त्यांनी शेती सुरु केली आणि उसाचे उत्पन्न घेतले. परंतु हा उस विकण्यासाठी त्यांना खूप परेशानी झाली अनेक साखर कारखान्यांच्या चकरा माराव्या लागल्या आणि या परेशानिमुळे त्यांना एक नवीन कल्पना सुचली.

 

मनोज यांनी गुळ बनवून विकण्याचा निर्णय घेतला, त्यांनी पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने गुल बनवण्यास सुरूवात केली, त्यांचा गुळ आज बाजारात ८० रुपये प्रतिकिलो भावाने विकल्या जात आहे. केवळ १० हजार रुपयांमध्ये त्यांनी हा व्यवसाय सुरु केला होता. मनोज आर्य यांनी ऑर्गेनिक पद्धतीने बनवलेला गुळ उत्तर प्रदेश व्यतिरिक्त दिल्ली, महाराष्ट्र, उत्तराखंड यासारख्या ७-८ राज्यांमध्ये विक्रीसाठी पाठवला जात आहे याठिकाणी त्यांच्या गुळाला खूप डिमांड आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here